Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"विमान उतरताना वाटलं, हा स्वातंत्र्याचा शेवटचा क्षण..."; जंतर-मंतरवर अभिजीत दिपके कडाडले!

"विमान उतरताना वाटलं, हा स्वातंत्र्याचा शेवटचा क्षण..."; जंतर-मंतरवर अभिजीत दिपके कडाडले!


"जेव्हा माझी फ्लाईट दिल्ली विमानतळावर लँड होणार होती, तेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या स्वातंत्र्याचे शेवटचे क्षण जगत आहे. या आंदोलनासाठी आणि देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी माझ्या स्वातंत्र्याची आहुती द्यायलाही पूर्णपणे तयार होतो," अशा अत्यंत भावनिक आणि आक्रमक शब्दांत ' कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जंतर-मंतरवरील हजारो तरुणांच्या ऐतिहासिक जनसागराला संबोधित केले.

अमेरिकेतून थेट दिल्लीत दाखल झालेल्या अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयावर जोरदार हल्ला चढवला. "मला भारतात येताना अटकेची तीव्र भीती होती. पण देशातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मी माझी अटक सोसण्यास आणि स्वातंत्र्य गमावण्यासही तयार होतो. आमच्या सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्या जाऊ शकतात, आमचे अकाऊंट्स ब्लॉक केले जाऊ शकतात, पण आमच्या मनातली अन्यायाविरुद्धची आग सरकार कधीच संपवू शकत नाही. गेल्या महिन्याभरापासून आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. पेपर लीकची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारलीच पाहिजे.", अशी मागणी दिपके याने केली.
सरकारकडून भटकवण्याचा प्रयत्न

"विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी आणि घोटाळेबाजांवर कारवाई करण्याऐवेजी, हे सरकार आमचे सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक करण्यात आणि आमच्या पोस्ट डिलीट करण्यात आपली ताकद वाया घालवत आहे. ही लढाई केवळ आजपुरती मर्यादित नाही. हा लढा खूप मोठा आणि प्रदीर्घ आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत आता मागे हटणार नाही. सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, या देशातील प्रामाणिक विद्यार्थी आणि तरुण पैशांनी किंवा दबावाने विकला गेलेला नाही.आपले हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि अत्यंत अनुशासित मार्गानेच पुढे जाईल. आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच सरकारला झुकवायचे आहे.", असे दिपके याने म्हटले.

जंतर-मंतरवर कडक सुरक्षा आणि विद्यार्थ्यांचा एल्गार
अभिजीत दिपके यांचे भाषण ऐकण्यासाठी जंतर-मंतर मैदानावर एकच गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके आणि तिरंगा घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आधीच निमलष्करी दलाच्या ४० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत आणि परिसरातील इंटरनेट सेवा अंशतः विस्कळीत झाली आहे. मात्र, दिपके यांच्या या भाषणामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह दुप्पट झाला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.