Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा उलटफेर? शिंदे गटासाठी 'मातोश्री'चे दरवाजे उघडे, राऊतांनी घातली 'ही' मोठी अट!

राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा उलटफेर? शिंदे गटासाठी 'मातोश्री'चे दरवाजे उघडे, राऊतांनी घातली 'ही' मोठी अट!


अहिल्यानगर: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना मनातील खदखद बाहेर काढली. सत्तार यांच्या मुलाने विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला आहे.

सत्तार यांनी भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीका केली होती. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. राऊत यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

भाजप मित्रपक्षांना संपवत असल्याच्या सत्तारांच्या आरोपांनंतर महायुतीत तीव्र पडसाद उमटत असून, त्यांना तातडीने प्रमुख नेत्यांनी बैठकीसाठी पाचारण केले आहे. एकीकडे सत्तारांची मनधरणी आणि चौकशीचे नाट्य सुरू असतानाच, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या वादात उडी घेत शिंदे गटातील नेत्यांना मोठी ऑफर दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "हे अब्दुल सत्तारांचे वैयक्तिक मत असू शकते. कदाचित त्यांना आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटासोबत गेल्याचा पश्चाताप झाला असावा." पुढे बोलताना त्यांनी महायुतीमधील अंतर्गत धुसफुशीवर थेट बोट ठेवले. "शिंदे गटातील काही नेते तर भाजपला 'स्लो पॉयझन' देखील म्हणत असल्याची माहिती मला कोणाकडून तरी मिळाली आहे," असा खळबळजनक दावा राऊतांनी केला.
त्यांनी मातोश्रीवर यावं, राऊतांच्या ऑफरने खळबळ

संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बंडखोरांना घरवापसीचे संकेत देत म्हटले, "जर कोणाला महायुतीत गुदमरल्यासारखे वाटत असेल आणि भाजप हे स्लो पॉयझन आहे अशी खात्री पटली असेल, तर त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या छत्रछायेखाली यावे, असे वक्तव्य केले. काही विशिष्ट नेत्यांना आमच्या पक्षात पुन्हा येण्यास कायमचा मज्जाव असेल हे मात्र नक्की," असे सांगत त्यांनी मातोश्रीच्या मनात नेमकं काय आहे, याचे संकेत दिले. सत्तारांच्या विधानामुळे महायुतीत आधीच तणाव असताना, राऊतांच्या या 'स्लो पॉयझन' आणि ऑफरच्या विधानाने राजकीय वातावरण आणखीच तापले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.