Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवृत्तीला फक्त ४ दिवस बाकी, ६६१ कोटींचा महाघोटाळा करून 'हा' IAS अधिकारी फरार!

निवृत्तीला फक्त ४ दिवस बाकी, ६६१ कोटींचा महाघोटाळा करून 'हा' IAS अधिकारी फरार!


हरियाणातील 661 कोटी रुपयांच्या आयडीएफसी बँक घोटाळा प्रकरणातील संशयित आयएएस अधिकारी निवृत्तीच्या चार दिवस आधीच फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयएएस अधिकारी प्रदीप डागर असे त्यांचे नाव असून त्यांचा मोबाईल फोनही बंद आहे. या घोटाळ्यातील संशयित आरोपी फरार झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रदीप डागर हे ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत हरियाणा राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे सदस्य सचिव होते. 

या कार्यकाळात बोर्डाच्या खात्यातून 169 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर 8 एप्रिल रोजी प्रदीप डागर यांना परिवहन विभागाचे संचालक आणि विशेष सचिव या पदावरून निलंबित करण्यात आले होते. एकूण 661 कोटींच्या या घोटाळय़ात विविध सरकारी विभाग आणि शेल कंपन्यांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआयने हरियाणाचे दोन आयएएस अधिकारी पंकज अग्रवाल आणि आर. के. सिंग यांना अटक केली आहे. आयएएस अधिकारी नवनीत श्रीवास्तव यांनाही ताब्यात घेण्यात आले असून सध्या ते तुरुंगात आहेत. मणिराम शर्मा यांसारख्या इतर अधिकाऱयांच्याही संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

डागर यांची कोट्यवधींची मालमत्ता
2025-26 च्या स्थावर मालमत्ता विवरणानुसार प्रदीप डागर यांच्याकडे रोहतक आणि गुरुग्राममध्ये आलिशान फ्लॅट आणि कोटय़वधी रुपयांची जमीन असल्याचे तपासादरम्यान उघड झाले. कागदपत्रांनुसार रोहतकची जमीन त्यांना भेट म्हणून मिळाली होती तर इतर मालमत्ता त्यांनी खरेदी केल्या होत्या. सध्या प्रदीप डांगर हे फरार असून सीबीआयच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या अटकेनंतर तपासाला नवी दिशा मिळणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.