Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!


बाजारात खरेदी केल्यानंतर अनेकदा आपण घाईघाईत मिळणाऱ्या सुट्या पैशांची नीट तपासणी करत नाही. मात्र, सध्या बाजारात बनावट किंवा नकली नोटांचा सुळसुळाट वाढलेला असताना, तुमची ही एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकतो.

ग्राहकांची अशा प्रकारच्या संभाव्य फसवणुकीपासून सुटका व्हावी आणि त्यांना नकली नोटा सहज ओळखता याव्यात, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 200 रुपयांच्या खऱ्या नोटेची वैशिष्ट्ये आणि ती ओळखण्याच्या अत्यंत सोप्या पद्धती जाहीर केल्या आहेत. ग्राहकांनी पुढील वेळी व्यवहार करताना नोटांमधील हे बारकावे तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

आरबीआयच्या माहितीनुसार, 200 रुपयांच्या खऱ्या नोटेच्या डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात एक विशेष पारदर्शक  भाग दिलेला असतो. ही नोट जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या समोर किंवा उजेडात धरुन सरळ पाहाल, तेव्हा त्या रिकाम्या वाटणाऱ्या पारदर्शक भागात तुम्हाला '200' हा आकडा अगदी स्पष्टपणे दिसेल. खऱ्या नोटेचे आणखी एक मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या नोटेवर मुख्य इंग्रजी अंकांशिवाय आपल्या देवनागरी (मराठी/हिंदी) लिपीमध्ये देखील '200' ही राशी स्पष्टपणे छापलेली असते. बनावट नोटांमध्ये सहसा या बारीक आणि दर्जेदार छपाईची फिनिशिंग अजिबात पाहायला मिळत नाही. याशिवाय, खऱ्या नोटेच्या समोरच्या भागाच्या अगदी मध्यभागी महात्मा गांधी यांचे पारंपरिक आणि अत्यंत स्पष्ट चित्र छापलेले असते, जे सहज नजरेस पडते.

सुरक्षेच्या दृष्टीने नोटेच्या उजव्या बाजूला खाली रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी, धारकाला ती रक्कम देण्याचे वचन देणारा गॅरंटी क्लॉज आणि आरबीआयचा अधिकृत लोगो छापलेला असतो. खऱ्या नोटेच्या छपाईचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, नोटेवर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात आणि खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात क्रमांकाचे पॅनेल दिलेले असते. या पॅनेलमधील अंकांचे आकार डावीकडून उजवीकडे जाताना लहान कडून मोठे होत जातात. तसेच, नोटेच्या समोरच्या भागात खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात आपले राष्ट्रीय चिन्ह 'अशोक स्तंभ' बनवलेले असते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.