Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधानांना संपवण्याचा कट? 'या' एका धमकीच्या मेसेजने संपूर्ण देश हादरला!

पंतप्रधानांना संपवण्याचा कट? 'या' एका धमकीच्या मेसेजने संपूर्ण देश हादरला!


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  पुढील आठवड्यात सोमवारी (9 जुलै) रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. ही धमकी मेलबर्नमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 'मेलबर्न मीट्स मोदी' या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टवरील कमेंटद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आहे.

द ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेलबर्न भेटीदरम्यान ९ जुलै रोजी मार्व्हल स्टेडियममध्ये 'मेलबर्न मीट्स मोदी' या नावाने एका सामुदायिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या. याच पोस्टपैकी एका फेसबुक पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये एक आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. या टिप्पणीत पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

संशयित कमेंटची चौकशी सुरू
अबू मुस्तफा' नावाच्या फेसबुक खात्यावरून करण्यात आलेल्या कमेंटमध्ये असा मजकूर लिहिण्यात आला होता की, कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छत बंद ठेवावे, अन्यथा तो ऑस्ट्रेलियात स्वतःच्या मृत्यूसाठी येत आहे. या धमकीनंतर ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून, कार्यक्रमाच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.