🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील बार, हॉटेल रेस्टॉरंट पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु राहणार; सरकारने GR काढला

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील बार, हॉटेल रेस्टॉरंट पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु राहणार; सरकारने GR काढला


थर्टी फस्टला ज्या प्रमाणे पहाटे पर्यंत बार, हॉटेल रेस्टॉरंट खुले राहतात. त्याचप्रमाणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील बार, हॉटेल रेस्टॉरंट पहाटे 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. फिफा विश्वचषक अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील GR सरकारने काढला आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अर्जेंटिना आणि स्पेन या दोन बलाढ्य संघांमध्ये हा अंतिम सामना रंगणार आहे. फिफा विश्वचषक अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील रेस्टॉरंट आणि कॅफे 19 जुलैच्या मध्यरात्रीपासून 20 जुैलच्या पहाटे 4 वाजेपर्यंत उघडे राहणार आहेत. सरकारने बार, हॉटेल रेस्टॉरंट पहाटे चार वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे.

सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम होणार आहे. सामना रात्री 12:30 वाजता सुरू होणार. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने ही सवलत दिली आहे. राष्ट्रीय रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई यांनी बार, हॉटेल रेस्टॉरंट पहाटे चार वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मागितली होती. अतिरीक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे तसेत कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडल्यास संबधीत आस्थापनावर कारवाई केली जाईल असे देखील या आदेशात म्हंटले आहे.

FIFA Fan Festival मध्ये महाराष्ट्राच्या ढोल-ताशाचा दमदार नाद
फिफा वर्ल्ड कप 2026 दरम्यान डॅलसमध्ये सुरू असलेल्या FIFA Fan Festival मध्ये महाराष्ट्राच्या ढोल-ताशाचा दमदार नाद घुमतोय.. टेक्सासमधील 'शिवम ढोल ताशा पथका'ची या प्रतिष्ठित महोत्सवासाठी करारबद्ध कलाकार म्हणून निवड झाली असून १कोणत्याही FIFA Fan Festival मध्ये सादरीकरण करणारं हे एकमेव ढोल-ताशा पथक ठरलंय.. पूर्णपणे स्वयंसेवकांच्या बळावर उभ्या राहिलेल्या या संस्थेने दशकभराच्या सातत्यपूर्ण मेहनतीतून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जागतिक मंचावर पोहोचवलाय.. त्यांच्या प्रभावी सादरीकरणांमुळे आयोजकांनी अतिरिक्त कार्यक्रमांसाठीही निमंत्रण दिलं असून 19 जुलै रोजी होणाऱ्या World Cup Final Day Celebration मध्ये डॅलसच्या व्यावसायिक क्रीडा संघांच्या मॅस्कॉट्ससोबत विशेष सादरीकरणाची संधी मिळालीय.. 2014 मध्ये स्थापन झालेल्या शिवमने अमेरिकेत 330 हून अधिक कार्यक्रम सादर करत लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.. आता फिफाच्या मंचावर महाराष्ट्राच्या समृद्ध संगीत परंपरेचा जागतिक गौरव अधिक उंचावलाय.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.