🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षक होणार 'एआय'मध्ये निपुण: १ ली ते १२ वीच्या शिक्षकांना 'एआय साथी' प्रशिक्षण सक्तीचे!

शिक्षक होणार 'एआय'मध्ये निपुण: १ ली ते १२ वीच्या शिक्षकांना 'एआय साथी' प्रशिक्षण सक्तीचे!


कोल्हापूर : पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी 'एआय साथी फॉर एज्युकेटर्स' हा ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 
शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी, सुरक्षित व नैतिक वापर करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा कोर्स 'दीक्षा' पोर्टलवर उपलब्ध आहे. शिक्षकांना ३१ ऑगस्टपर्यंत कोर्ससाठी नोंदणी करता येणार असून ३० सप्टेंबरपर्यंत तो पूर्ण करणे आवश्यक आहे. कोर्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना, अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी एआयचा वापर, अध्ययन साहित्य निर्मिती, मूल्यमापन तसेच शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात एआय साधनांचा जबाबदारीने वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
कोर्स शिक्षकांना स्मार्ट फोन किंवा लॅपटॉपवरून पूर्ण करता येणार आहे. यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत या प्रशिक्षणासाठी चार तासांचे सीपीडी श्रेय मंजूर करण्यात आले आहे. 'एससीईआरटी'च्या संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना व प्राचार्यांना मुदतीत सर्व शिक्षकांकडून कोर्स पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

'एआय', मशिन लर्निंगचे मिळणार मार्गदर्शन
कोर्सद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंग यांच्या मूलभूत संकल्पना, शिक्षण क्षेत्रातील 'एआय'चे विविध उपयोग, 'एआय' आधारित उपयुक्त साधनांचा प्रभावी वापर, दैनंदिन व प्रशासकीय कामकाजात 'एआय'चा समावेश करण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.