🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सलमान खानचा 'तो' लूक पाहून चाहते हादरले! सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सलमान खानचा 'तो' लूक पाहून चाहते हादरले! सोशल मीडियावर चर्चांना उधाण


बॉलीवूडचा 'भाईजान' सलमान खान हा नुकताच मुंबईतील एका शासकीय कार्यक्रमात सहभागी झाला होता. मात्र, त्या कार्यक्रमाच्या वेळी त्याचा बदलेला लूक हा चर्चेचे कारण ठरला आहे. रोमँटिक हीरो म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सलमानने अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचा लूक आणि स्टाईल ही सलमानची ओळख बनली आहे. मात्र, आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामध्ये ६० वर्षीय सलमान खानचा चेहरा खूपच थकलेला दिसत असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. सलमानचा बदललेला लूक पाहून, चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली आहे. 

सलमान खानने शुक्रवारी (१७ जुलै) पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) 'अॅडव्हान्स्ड डेटा कलेक्शन अँड व्हेरिफिकेशन सपोर्ट सेंटर'चे उद्घाटन केले. यावेळी त्याने लाभार्थींना घरांच्या चाव्याही सुपूर्द केल्या. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या बदललेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये त्याचा चेहऱ्यावर थकवा आणि वाढत्या वयाच्या खुणा जाणवत असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले.

सलमान खान असा का दिसतोय? - नेटकऱ्यांना पडला प्रश्न
सलमान खानचा लूक पाहून एका नेटकऱ्याने लिहिले, "सलमान खान असा का दिसतोय? त्याला नक्की काय झालंय?" तर दुसऱ्याने, "सलमानच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करा," अशी कमेंट केली आहे. आणखी एका चाहत्याने, "सलमानला असं पाहून खूप वाईट वाटलं. तो आमच्या काळातील सर्वांत हँडसम हीरो आहे," असे म्हटले. तर एका युजरने, "आयुष्य व तारुण्य कधीच टिकून राहत नाही आणि विकतही घेता येत नाही," असे म्हटले आहे. 

एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरून, "हे पाहून खरंच वाईट वाटतं. त्याच्या डोळ्यांतला थकवा स्पष्ट दिसतोय. तो आजारी असल्यासारखा दिसतोय. चित्रपटांमध्ये 'भाई' एकटा ५० लोकांना हरवतो; पण आता त्याच्यामध्ये पूर्वीसारखा उत्साह दिसत नाही. सलमान खानला नेमकं काय झालंय? त्याला आजारपण आलंय का" असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत. मात्र, सलमान खानच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सलमान खानचा 'मातृभूमी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

सलमानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सलमान खान नुकताच रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात जिवा महाले यांच्या भूमिकेत झळकला होता. तसेच त्याचा आगामी 'मातृभूमी' हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. परंतु, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर सलमान खानच्या बदललेल्या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.