🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता गॅस संपण्याचं टेन्शन खल्लास! BPCL ची 'ही' भन्नाट सर्व्हिस; १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण सिस्टम बदलणार

आता गॅस संपण्याचं टेन्शन खल्लास! BPCL ची 'ही' भन्नाट सर्व्हिस; १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण सिस्टम बदलणार


मुंबई: तुम्हालादेखील जड-जुना गॅस सिलेंडर उचलण्याचा कंटाळा आला असल्यास आता तुम्हाला एक चांगली आनंदाची बातमी आहे. देशातील अग्रगण्य सरकारी तेल कंपनी 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (BPCL) ने आपल्या ग्राहकांसाठी 'भारतगॅस लाइट जिप' (Bharatgas Lite ZIP) नावाची एक नवीन प्रीमियम एलपीजी सेवा लाँच केली आहे.

या सुविधेंतर्गत ग्राहकांना वजनाने हलका कंपोजिट गॅस सिलेंडर, झटपट नवीन कनेक्शन आणि एक्सप्रेस गॅस डिलिव्हरी मिळणार आहे. आजच्या वेगवान युगात ग्राहकांना गॅस कनेक्शन आणि डिलिव्हरीसाठी ताटकळत राहावे लागू नये, यासाठी ही सेवा डिझाइन करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.


१५ ऑगस्टपासून २४ राज्यांमध्ये धमाका!
सध्या या 'भारतगॅस लाइट जिप' सेवेची सुरुवात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून करण्यात आली आहे. मात्र, येत्या १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत देशातील २४ राज्यांमधील तब्बल १०० शहरांमध्ये ही सेवा विस्तारली जाईल, अशी घोषणा BPCL ने केली आहे. म्हणजेच आगामी काही आठवड्यांतच लाखो ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. BPCL चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) संजय खन्ना आणि विपणन संचालक शुभंकर सेन यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
काय आहेत या नव्या सिलेंडरची वैशिष्ट्ये?

वजनाने अत्यंत हलका: नियमित स्टील सिलेंडरच्या तुलनेत हा 'भारतगॅस लाइट कंपोजिट सिलेंडर' कमालीचा हलका आहे. त्यामुळे घरातील कोणतीही व्यक्ती तो सहज हाताळू शकते. पारदर्शक (Translucent) बॉडी: या सिलेंडरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची बॉडी अर्धपारदर्शक आहे. त्यामुळे सिलेंडरमध्ये नेमकी किती गॅस शिल्लक आहे, हे ग्राहकांना डोळ्यांनी स्पष्टपणे पाहता येईल. म्हणजेच ऐनवेळी गॅस संपण्याची भीती आता राहणार नाही. गंजमुक्त आणि सुरक्षित: हा सिलेंडर गंजरोधक असून, यात प्रगत सुरक्षा फीचर्स आणि आधुनिक डिझाइन देण्यात आले आहे, ज्यामुळे तो दिसायला आकर्षक आणि वापरण्यास अत्यंत सुरक्षित आहे.

सरकारी कंपन्यांमध्ये 'डिलिव्हरी वॉर' सुरू!
देशातील एलपीजी क्षेत्रात प्रीमियम सेवा आणि क्विक डिलिव्हरी देण्याची स्पर्धा आता तीव्र झाली आहे. काही दिवसांपूर्वीच 'हिंदुस्तान पेट्रोलियम' (HPCL) ने 'स्विगी इंस्टामार्ट' (Swiggy Instamart) सोबत भागीदारी करून 'ऑन-डिमांड एलपीजी डिलिव्हरी' सुरू केली होती. तसेच बंगळुरूमधून 'HP Navya' नावाचा हलका कंपोजिट सिलेंडरही बाजारात आणला होता, ज्यामध्ये आधी कनेक्शन नसले तरी नवीन सिलेंडर ऑर्डर करता येतो. त्याला तोडीस तोड उत्तर म्हणून आता BPCL ने हे पाऊल उचलले आहे.

तज्ज्ञांच्या मते, सरकारी तेल कंपन्या आता डिजिटल तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या सोयीला प्राधान्य देत आहेत, हे यावरून स्पष्ट होते. विशेषतः छोटे कुटुंब, भाड्याच्या घरात राहणारे लोक, विद्यार्थी आणि कामकाजी लोकांसाठी हे हलके सिलेंडर आणि फास्ट डिलिव्हरी गेमचेंजर ठरणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.