🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री ‘देवाभाऊ’ यांच्या वाढदिवसानिमित्त जनसुराज्य शक्ती पक्षाचा अनोखा सेवायज्ञ; पंढरपूरमधील वारकऱ्यांसाठी १ लाख पाण्याचे बॉटल्स आणि १ लाख राजगिरा लाडू रवाना


मुख्यमंत्री ‘देवाभाऊ’ यांच्या वाढदिवसानिमित्त जनसुराज्य शक्ती पक्षाचा अनोखा सेवायज्ञ; पंढरपूरमधील वारकऱ्यांसाठी १ लाख पाण्याचे बॉटल्स आणि १ लाख राजगिरा लाडू रवाना


मिरज :- आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या लाखो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाने एक अत्यंत स्तुत्य आणि संवेदनशील उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ‘देवाभाऊ’ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी १ लाख स्वच्छ पाण्याच्या बॉटल्स आणि १ लाख राजगिरा लाडू यांनी भरलेला आयशर टेम्पो आज मिरजेतून पंढरपूरकडे रवाना करण्यात आला.

​वारकरी सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा!

​"पांडुरंगाच्या भेटीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा" हा पवित्र संदेश देत जनसुराज्य शक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

​आज मिरज येथे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते या मदत साहित्याने भरलेल्या आयशर टेम्पोचे भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आले. यानंतर गाडीला हिरवा झेंडा दाखवून पंढरपूरकडे मार्गस्थ करण्यात आले. आषाढी वारीच्या काळात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची पाण्यासाठी व फराळासाठी गैरसोय होऊ नये, या शुद्ध हेतूने हा अनोखा सेवा यज्ञ राबवला जात असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ​या समाजोपयोगी उपक्रमाच्या प्रसंगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यामध्ये: 
​आनंद सागर पुजारी (सांगली जिल्हाध्यक्ष)
​डॉक्टर पंकज म्हेत्रे (शहर जिल्हाध्यक्ष)
​योगेश दरवंदर (शहराध्यक्ष)

​आप्पा पुजारी, अरविंद पाटील, पवन बंगले, विशाल पडळकर, मोहसीन जमादार, प्रणित पाटील, कीर्तीकुमार सावलवाडे, माणिक तोडकर, गिरीश नलवडे, मोहन पाटील, विकी गोसावी, धनराज ताटे, उमेश आवटी, शुभम वाघमारे, ओंकार जाधव, सुशांत काळे, शिवाजी महाडिक, नानासाहेब घोरपडे, मनोज पाटील.

​या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या या संवेदनशील आणि वारकरीभिमुख उपक्रमाचे सध्या सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.