🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

...आणि नेपाळ धगधगले! तिघांच्या आत्मदहनाने आंदोलनाचा भडका, सरकारविरोधात तीव्र संताप

...आणि नेपाळ धगधगले! तिघांच्या आत्मदहनाने आंदोलनाचा भडका, सरकारविरोधात तीव्र संताप


काठमांडू : नेपाळमध्ये तरुणांची वाढती नाराजी पुन्हा रस्त्यावर दिसू लागली आहे. गेल्या तीन दिवसांत तीन तरुणांनी स्वतःवर पेट्रोल शिंपडून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे.
जेन-झीच्या क्रांतीनंतर सत्तेत आलेले नेपाळचे सर्वांत तरुण पंतप्रधान पंतप्रधान बालेन्द्र शाह बालेन यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. राजधानी काठमांडूमध्ये तरुण निदर्शने करत आहेत, तर विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने सरकारवर तरुणांमध्ये आशा आणि विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.

जेन-झी नेपाळ संघटनेने पंतप्रधान बालेन शाह यांच्यावर जनविरोधी आणि निरंकुश पद्धतीने शासन चालवल्याचा आरोप केला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, अर्थसंकल्प आणि धोरणांमध्ये तरुणांचा रोजगार आणि उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.
नेपाळमध्ये सातत्याने समोर येत असलेल्या या घटनांनी तरुणांची मानसिक स्थिती, बेरोजगारी आणि सरकारी धोरणांबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. सरकारने लवकर प्रभावी पावले उचलली नाहीत, तर विरोध अधिक तीव्र होऊ शकतो, अशी भीती नेपाळमधील इतर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.