🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपप्रमुखपदी मिरजचे समीर शहा, तर सांगली जिल्हा शहर सेक्रेटरीपदी दर्शन गणे यांची निवड

भाजप जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपप्रमुखपदी मिरजचे समीर शहा, तर सांगली जिल्हा शहर सेक्रेटरीपदी दर्शन गणे यांची निवड

​९ ऑगस्ट रोजी सांगलीत भाजप जैन प्रकोष्ठ वर्धापन दिन सोहळा; स्वदेशी व्हिला येथे बैठकीत पूर्वतयारीचा आढावा
​सांगली:

भारतीय जनता पक्ष जैन प्रकोष्ठच्या संघटन विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रदेश उपप्रमुखपदी मिरज येथील समीर किरण शहा (फुरिया) यांची निवड प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांनी केली आहे. तसेच सांगली जिल्हा शहर भाजपा जैन प्रकोष्ठ सेक्रेटरीपदी दर्शन भूपाल गणे यांची निवड सांगली जिल्हा शहर अध्यक्ष महावीर पाटील यांनी केली आहे.
​दरम्यान, भाजप जैन प्रकोष्ठचा आगामी वर्धापन दिन ९ ऑगस्ट रोजी सांगली येथे उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. 

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी 'स्वदेशी व्हिला' येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांमधील प्रमुख पदाधिकारी व सदस्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

​या बैठकीदरम्यान नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. भाजप जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते समीर शहा यांचा विशेष सत्कार करून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच सांगली जिल्हा शहर अध्यक्ष महावीर पाटील यांच्या हस्ते दर्शन गणे यांचा सत्कार करून नियुक्तीपत्र सोपवण्यात आले.

​संघटनेच्या या बैठकीस आणि सत्कार समारंभास अमित चिंचवाडे यांच्यासह जैन समाजातील व भाजप जैन प्रकोष्ठचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी ९ ऑगस्टचा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.