नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अभिजीत दीपके घरी परतले आहेत. दीपके यांचं छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचल्यानंतर जल्लोषात स्वागत केलं. मायभूमीत परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जिव्हारी लागणारा टीकेचा वार केला. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शॉर्ट व्हिडिओ तयार करून तरुणांशी संवाद साधण्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुर्ची सोडावी, इन्फ्लुएन्सर बनावं, अशा शब्दात अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
अभिजीत दीपके बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. मायभूमीत परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ‘पतंप्रधान नरेंद्र मोदींनी इन्फुएन्सर बनावं. ते काम चांगल्याप्रकारे करत आहेत. त्यांनी त्यांच खुर्ची सोडावी. पंतप्रधानपदाचं काम दुसरा एखादा व्यक्ती करेल, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवर भाष्य केलं. ‘पंतप्रधान मोदींनी कॅमेऱ्याचा अँगल बदलण्यापेक्षा हृदया अँगल बदलावा लागेल, असे प्रियांका गांधींनी म्हटलं. लोकसभेत मंजूर झालेल्या पेपरफुटी विरोधी विधेकावर अभिजीत दीपके यांनी भाष्य केलं. ‘खरंतर केवळ कायद्याने समस्या सुटणार नाहीत. जोपर्यंत प्रभावी अंमलबजावणी होत नाहीत, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. मला वाटते की, विधयके बनत राहतील. परंतु अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. या देशात अनेक कायदे बनवण्यात आले आहेत. एकापाठोपाठ एक कायदे मंजूर होताहेत, असे त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेपरफुटी प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅकची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन दिवसांआधी या प्रकरणात फास्ट ट्रॅकची घोषणा केली. आता पेपरफुटी प्रकरणात न्याय मिळेल, या विचाराने लोक खूप आनंदी झाले. पण नेमकं काय झालं. या प्रकरणाची पहिलीच सुनावणी सरकारी वकील न आल्याने पुढे ढकलण्यात आली. तुम्ही हवे ते कायदे बनवा, जोपर्यंत अंमलबजावणी करणारे लोक चांगले नसतील, तोपर्यंत कायद्यांचा काय उपयोग? असा सवाल अभिजीत दीपके यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.