महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. नीट पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
त्याचबरोबर राज ठाकरे यांनी सरन्यायाधीश यांनाही टोला लगावला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. क्रॉकरोच जनता पक्षाकडून आंदोलन पुकारलं असून लाखो तरुणांनी समर्थन देत दिल्लीत पोहोचले आहेत. 20 मार्चला सीजेपीने काढलेल्या संसद मार्चला हिंसक वळण लागले होते. त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कथित लाठीचार्जबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बोलण्यास नकार दिला होता. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूर्यकांत यांना टोला लगावला आहे.
सरन्यायाधीश बोलले की सीसीटिव्ही फुटेज पाहण्याकडे आमच्याकडे वेळ नाही. पण त्यांच्यामुळंच हे झुरळ सुरू झालं ना. त्यांनीच जन्म दिल्यावर पोराकडे बघायला नको का? असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. पोलिसांच्या गाडीतून जात असताना पोलिसांनी काही मुलांना धमकी दिली. 50 ग्रॅमची पावडर टाकेन. आता पोलिसांकडे पावडर पण मिळायला लागली का? तो काय ड्रग सप्लायर आहे का?, असा सवालही राज ठाकरेंनी केला आहे. तसंच, मुलींचे कपडे फाडडे, गुंडांच्या हातात लाठ्यकाठ्या कुठून आल्या, मग आता त्यांच्यावरती देखील कारवाई करणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
26 तारखेला काही झाले तर फटकावून काढेन: राज ठाकरे
26 जुलै रोजी मोर्चात असं कोणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर फटकावून काढू. शांततेनं हा मोर्चा होईल. कोणताही गोंधळ नसेल. इथे दिल्लीत केल्यासारखं प्रयत्न झाला तर आमची लोकं सोडणार नाहीत, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. या मोर्चात फक्त तिरंगा असेल, कोणत्याच पक्षाचा झेंडा नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.