अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा पंढरपुरात पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता ही महापूजा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडली. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बळीराजाला सुखाचे दिवस यावेत, चांगला पाऊस व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा, अशी प्रार्थना केली.
या शासकीय महापूजेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही रांगेतील एका निष्ठावंत वारकरी दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा बहुमान मिळाला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगावचे शेतकरी श्री. बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रभावती बाळासाहेब माने या वारकरी दांपत्याला यंदाचे 'मानाचे वारकरी' म्हणून पूजा करण्याचा सन्मान लाभला. विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाल्याने माने दांपत्याने अत्यंत भावूक होऊन आनंद व्यक्त केला.
बा विठ्ठला राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेव..राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे असे साकडे आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणीची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज (ता.25) पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते भक्तीभावाने व उत्साहाने संपन्न झाली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान बाळासाहेब माधव माने व त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने ( रा.गौरगांव ता.कळंब जि. धाराशिव) या शेतकरी दाम्पत्याला मिळाला. बाळासाहेब माने ( वय 70) हे शेतकरी असून ते गेल्या 20 वर्षा पासून आळंदी पंढरपूर पायी वारी करतात. यंदा ते आपल्या पत्नीसोबत वारीला आले आहेत. मध्यरात्री 12 वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली तेव्हा रांगेत प्रथम असलेल्या बाळासाहेब माने यांची निवड समितीने मानाचा वारकरी म्हणून निवड केली.
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी दुपारीच पंढरपुरात दाखल झाले होते. आज पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस व इतर कुटुंबीय मंदिरात पोहचले. अडीच वाजता त्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर माता रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली. यावर्षी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सहाव्यांदा विठ्ठल रुक्मिणी ची आषाढीची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली आहे.
त्यापूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते विठ्ठलाची नित्य पूजा संपन्न झाली. रूक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते तर पाद्य पूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आली.यावर्षी आषाढी यात्रेसाठी देशभरातून सुमारे तीस लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठुरायाच्या जयघोषाने व टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. आषाढी एकादशीच्या पर्वकाळातील स्नानासाठी चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांची दाटी झाली आहे. तर पंढरीला आज भक्तीचा महापूर आला आहे.
संत नामदेव पायरी, पश्चिम द्वार, महाद्वार येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. तर प्रदक्षिणा मार्गावर नगर प्रदक्षिणेसाठी दिंड्यांनी गर्दी केली आहे. पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरा पासून सुमारे 20 किलोराज्यात चांगला पाऊस पडू दे! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा; 'माने दाम्पत्य' ठरले मानाचे वारकरीमीटर अंतरावर गेली आहे. दर्शन रांगेत जवळपास 80 हजारांहून अधिक भाविक उभे आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.