🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जंतर-मंतरवरील आंदोलनाचे पडसाद: महाराष्ट्रात फडणवीस सरकार सतर्क, पोलिसांची सोशल मीडियावर नजर

जंतर-मंतरवरील आंदोलनाचे पडसाद: महाराष्ट्रात फडणवीस सरकार सतर्क, पोलिसांची सोशल मीडियावर नजर


देशाची राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीनं गेल्या महिन्याभरापासून कथित पेपरफुटीविरोधात आंदोलनं केली. यानंतर सीजेपीने 20 जुलै रोजी 'संसद मार्च'ची घोषणा करतानाच देशातील हजारो तरुणांनी त्यात सहभागी व्हावं, दिल्लीला यावं, असंही आवाहन केले होते.

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या या आवाहनाला तरुणाईकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचाच परिणाम म्हणून हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी दिल्ली पोलिसांना बळाचा वापर करत लाठीचार्ज करावा लागला. यामुळे हे आंदोलन जास्तच चिघळलं. यानंतर राज्यातलं फडणवीस सरकारही अलर्ट मोडवर आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं समोर येत आहे. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी डिजिटल पेट्रोलिंग सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. 
दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर सर्वच स्तरांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे सीजेपीचं आंदोलन तापलं असतानाच महाराष्ट्र पोलिसही अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचमुळे राज्य पोलिस सोशल मीडियावर कडक लक्ष ठेवून असल्याचं दिसून येत आहे. 

मुंबई पोलिस हे तब्बल 14 दिवसांपासून अलर्ट मोडवर आहेत. पोलिसांकडून सोशल मीडिया देखरेख, गोपनीय माहिती गोळा करणं, आक्रमक, चिथावणीखोर भाषणं, वादग्रस्त प्रतिक्रिया, आक्षेपार्ह व्हिडीओ, स्टेटस यांनी समाजातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याचं काम सुरू आहे.
पोलिसांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आंदोलनाशी वापरण्यात येणारे हॅशटॅग, कीवर्ड्स तसेच सातत्यानं पोस्ट करणाऱ्या अकाउंट्सवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात आलं. आंदोलनावर निगडित प्रचार करणाऱ्या व्यक्तींवर पोलिस नजर ठेवून आहेत. या बाबींमुळे पोलिसांनी आंदोलनाशी संबंधित संभाव्य जमाव, आंदोलनाची ठिकाणं तसेच आयोजकांविषयीची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांना यश आलं.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.