🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"लोकशाहीचं हेच तर सर्वात मोठं दुर्दैव! सरन्यायाधीशांच्या नियुक्तीवरून रोहित पवारांचा भीषण संताप!"

"लोकशाहीचं हेच तर सर्वात मोठं दुर्दैव! सरन्यायाधीशांच्या नियुक्तीवरून रोहित पवारांचा भीषण संताप!"

दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जविरोधात सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली होती त्यावर तातडीने सुनावणी करण्यास सरन्यायधीश सूर्य कांत यांनी नकार दिला आहे.

यावेळी त्यांनी ‘आमचा वेळ वाया घालवू नका’, असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरन्यायधीशांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

”दिल्लीत तरुणाईवर झालेल्या अमानुष लाठीचार्जची सुनावणी करणे म्हणजे टाईमपास असल्याचं मत लोकशाहीत ज्या स्तंभाकडं आशेनं पाहिलं जातं ते सरन्यायाधीश सूर्यकांत साहेब हेच नोंदवत असतील तर याला काय म्हणावं?”, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

तसेच ”सरन्यायाधीश पदावरील व्यक्तीने पदाचं भान बाळगणं गरजेचं आहे, अन्यथा त्या पदाच्या प्रतिष्ठेला तडे गेल्याशिवाय राहणार नाहीत. सरन्यायाधीश पदाचा अत्यंत आदरच आहे, परंतु तरुणाईप्रती एवढी असंवेदनशील भावना आणि लोकशाहीविरोधी मानसिकता असलेली व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी बसली, हेच आपल्या लोकशाहीचं दुर्दैव नाही का? असेही रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.