🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले


आतापर्यंत दिल्लीचं आंदोलन ठीक चालू होतं. परंतु सरकारनं अमानुषपणे लाठीचार्ज करायला लावला. सरकार इतकं क्रूपणे वागतं हे पाहिल्यांदा पाहिलं. त्यामुळे सरकारचा माज उतरवला पाहिजे. असं म्हणत मनोज जरांगे पाटील हे सरकारवर कडाडले. लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आणि कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील दिल्लीला उद्या जाणार आहेत.
पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध करायला सुध्दा  शब्द नाहीत. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज झाला. त्यावरून वाटतं सरकार इतकं क्रूरपणे वागू शकतं हे पहिल्यांदा पाहिलं असं जरांगे पाटील म्हणाले. मुलांचे पाय तुटेपर्यंत त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. महाराष्ट्रातील आणि देशातील विद्यार्थ्यांना भाजपचं सरकार लोकशाही मार्गाने जगू देत नसेल तर सरकारचा माज उतरवला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.