नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पक्षाच्या (सीजेपी) 'चलो संसद' मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. परीक्षेतील अनियमिततेवर प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार बळाचा वापर करत असून, मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठे युवकविरोधी पंतप्रधान असल्याची तोफ राहुल गांधींनी डागली.
पेपरफुटीवरून वारंवार वाद निर्माण होऊनही सरकार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला. ते म्हणाले, ''पंतप्रधान मोदी युवकविरोधी असून, अपयशी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा ते राजीनामादेखील मागू शकत नाहीत.
१५२ प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे साडेसात कोटी विद्यार्थ्यांवर परिणाम झाला असून, या अनियमिततेसाठी जबाबदार असलेल्या कोणालाही अद्याप शिक्षा झालेली नाही. वरून शिक्षण व्यवस्थेबद्दल रास्त चिंता व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तरे मिळण्याऐवजी लाठीमार आणि अटकसत्राला तोंड द्यावे लागले.''संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरवात झाली असून पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पक्षाच्या संसदेवरील मोर्चामुळे अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या रणनीती बैठकीतही या मोर्चाची चर्चा झाली.काँग्रेस पक्षाने 'सीजेपी'च्या आंदोलनापासून अंतर राखण्याची घेतलेली भूमिका आणि 'नीट' पेपरफुटीप्रकरणात काँग्रेसतर्फे स्वतंत्रपणे सुरू असलेली आंदोलने, यापार्श्वभूमीवर संसदेमध्ये प्रामुख्याने राममंदिरातील दानचोरीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जावा, असे काँग्रेसचे म्हणणे होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.