Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साहित्यारत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतरास शासनाची मंजुरी

साहित्यारत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतरास शासनाची मंजुरी

सांगली, दि. ३० : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली" या संस्थेचे नाव आता "साहित्यारत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली" असे करण्यात आले आहे.

या निर्णयाबद्दल आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे विविध स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. या नामांतरासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विशेष प्रयत्न करणाऱ्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांचेही समाजातील विविध घटकांनी कौतुक केले आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावापुढे "साहित्यारत्न" हा मानाचा किताब अधिकृतपणे समाविष्ट झाल्याने सांगली जिल्ह्यासह राज्यभरातील अण्णा भाऊ साठे प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत संबंधितांनी मुख्यमंत्री, कौशल्य विकास विभाग तसेच सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.