🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

३०० वर्षांची परंपरा कायम: सांगलीत सूप वाजवत धावणाऱ्या 'तडकडताई'चे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी!

३०० वर्षांची परंपरा कायम: सांगलीत सूप वाजवत धावणाऱ्या 'तडकडताई'चे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी!


सांगली शहरातील विविध गल्लीबोळात काळ्या साडीत आणि काळा मुखवटा धारण करून, हातात सूप वाजवत धावणाऱ्या 'तडकडताई'ची मौज घेण्यासाठी यंदाही आबालवृद्धांसह बच्चेकंपनीची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्येष्ठअमावस्येनिमित्त सांगली शहरात साजरी होणाऱ्या या अनोख्या परंपरेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

​सांगलीचा हा सांस्कृतिक वारसा सुमारे ३०० वर्षांपासून तितक्याच श्रद्धेने जपला जात आहे. या परंपरेचा मान कुंभार समाजाकडे असून, पिढ्यानपिढ्या ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अखंडपणे सुरू आहे. लोकश्रद्धेनुसार, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी देवी तडकडताईचे रूप धारण करून शहरातील इडा-पीडा, संकटे आणि नकारात्मक शक्ती दूर करते. म्हणूनच तडकडताई सूप वाजवत गल्लोगल्ली फिरते आणि नागरिक तिचे दर्शन घेऊन जोगवा अर्पण करत सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

​परंपरेचे महत्त्व:
या विधीमध्ये 'काळ्या साडीला' वाईट शक्तींवर विजयाचे प्रतीक मानले जाते, तर हातातील 'सूप' घरातील संकटे आणि दुष्ट शक्ती बाहेर घालवण्याचे माध्यम मानले जाते. दैत्यांचा संहार करण्यासाठी देवीने हे उग्र रूप धारण केल्याची लोककथा आहे. ​बदलत्या काळातही ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा सांगलीची एक आगळीवेगळी ओळख म्हणून आजही तितक्याच उत्साहात जिवंत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.