🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत वसंतदादा अन् संभाजी महाराजांच्या नावावरून वाद पेटला; कार्यकर्त्यांनी अचानक थेट पंचायत समितीवरच ठोकला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचा नामफलक!

मिरजेत वसंतदादा अन् संभाजी महाराजांच्या नावावरून वाद पेटला; कार्यकर्त्यांनी अचानक थेट पंचायत समितीवरच ठोकला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांचा नामफलक!


मिरज:- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहाच्या नामकरणावरून राजकीय रणकंदन सुरू असतानाच, गुरुवारी मिरज पंचायत समितीच्या आवारात एका मोठ्या राजकीय घडामोडीने संपूर्ण तालुका हादरून गेला! तालुक्यातील आक्रमक आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी अचानक मिरज पंचायत समितीच्या नव्या इमारतीवर 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या नावाचा फलक ठोकून थेट नावच बदलून टाकले. या अचानक झालेल्या कारवाईने प्रशासनाची पार धांदल उडाली. ​नामफलक लावल्यानंतर कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणाबाजी करत पुष्पवृष्टी केली आणि फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला.


​वाद नेमका काय?

मिरज पंचायत समितीच्या जुन्या इमारतीतील सभागृहाला 'स्वर्गीय वसंतदादा पाटील सभागृह' असे नाव होते. नव्या इमारतीतही हेच नाव कायम ठेवण्याचा ठराव झाला होता. परंतु, भाजपने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते घाईघाईत उद्घाटन उरकताना या सभागृहाचे नाव 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह' असे दणक्यात जाहीर केले. यावरून सध्या काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये प्रचंड वादंग पेटले असून, हे प्रकरण आता कोल्हापूर सर्किट बेंच (उच्च न्यायालय) पर्यंत पोहोचले आहे.

​पोलिस बंदोबस्त तैनात, कार्यकर्त्यांची आक्रमक पावले
येत्या ४ ऑगस्ट रोजी सभापती व उपसभापती निवडीची धुमश्चक्री सुरू असतानाच, गुरुवारी सकाळी बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, विश्वास खांडेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पंचायत समिती आवारात धडकले. या घडामोडीची कुणकुण लागताच पोलिसांचा मोठा ताफा तातडीने तैनात करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमकपणे 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असा फलक लावून आपले स्थान स्पष्ट केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.