मुंबई : तुम्हाला नेहमीच तुमच्या जीमेल अकाउंटचा पासवर्ड लक्षात राहत नसेल. तर आता गूगलने याचं सोपं सोल्यूशन दिलं आहे. कंपनीने सेल्फी व्हिडिओच्या माध्यमातून गूगल अकाउंटमध्ये साइन इन करण्याचं नवं फीचर सुरू केलं आहे. या फीचरच्या मदतीने गरज पडल्यावर फक्त तुमचा चेहरा दाखवून अकाउंटमध्ये लॉगिन केलं जाऊ शकतं. खरंतर याचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या गूगल अकाउंटमध्ये हे फीचर सेटअप करावं लागेल.
सेल्फी व्हिडिओ फीचर सेटअप असं करा
गुगलनुसार, या फीचरला वापरण्यासाठी सर्वात आधी फोनमध्ये गूगल अॅप किंवा जीमेल अॅपला लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा. यांतर प्रोफाइल फोटोवर टॅप करुन मॅनेज योर गूगल अकाउंटमध्ये जा. येथे सिक्योरिटी अँड साइन इन सेक्शन ओपन करा आणइ खाली अॅड मोर साइन इन ऑप्शनमध्ये जाऊन सेल्फी व्हिडिओ ऑप्शन निवडा. कॅमेरा परमिशन दिल्यानंतर आणि अटी स्वीकारल्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या निर्देशांनुसार वेगवेगळ्या दिशेत चेहरा फिरवून सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करा. यानंतर तुमचा चेहरा अकाउंटमध्ये साइन इन करुन नवीन पद्धतीने सेव्ह होईल.
सेल्फी व्हिडिओ बदलणं किंवा हटवणं सोपं
तुम्ही आधीच सेल्फी व्हिडिओ सेव्ह केला आहे आणि तो बदलायचा किंवा हटवायचा आहे. तर हे कामही गूगल अकाउंटच्या सेटिंग्सने केलं जाऊ शकतं. यासाठी गूगल अॅप किंवा जीमेल अॅपमध्ये प्रोफाइल फोटोवर टॅप करुन मॅनेज योर गूगल अकाउंट ओपन करा.
यानंतर सिक्योरिटी अँड साइन इन सेक्शनमध्ये जाऊन सेल्फी व्हिडिओ ऑप्शन निवडा. येथे तुम्हाला आधी सेव्ह केलेले व्हिडिओ रिमूव्ह किंवा चेंज करण्याचा ऑप्शन मिळेल. नवीन व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा परमिशन द्या आणि स्क्रीनवर दिलेल्या निर्देशांनुसार पुन्हा चेहरा रेकॉर्ड करा.
गूगलने सांगितलं की, किती सुरक्षित आहे हे फीचर
गूगल म्हणते की, सेल्फी व्हिडिओ फीचरला प्रायव्हसी आणि सिक्योरिटी लक्षात ठेवून तयार केलंय. तुमचा सेल्फी व्हिडिओ तुमच्या परमिशनने सुरक्षित पद्धतीने सेव्ह केला जातो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणत्याही वेळी ते गूगल अकाउंटवरुन डिलिट करू शकता.कंपनीच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत तुम्ही इतर परवानग्यांसाठी संमती देत नाही, तोपर्यंत या व्हिडिओचा वापर केवळ साइन-इन प्रोसेसमध्ये मदत करण्यासाठी केला जातो. साइन-इन करत असताना, नवीन सेल्फी व्हिडिओची तुलना आधी सेव्ह केलेल्या व्हिडिओसोबत केली जाते.यासह लाइव्ह मूव्हमेंटची तपासणी आणि डीपफेक सारख्या बनावट फोटो किंवा व्हिडिओची ओळख करण्यासाठी अनेक सुरक्षित लेयरचा वापर केला जातो. गूगल म्हणते की, हे फीचर पासकी आणि रिकव्हरी कॉन्टॅक्ट सारख्या सुरक्षित साइन इन ऑप्शनसह मिळून अकाउंटपर्यंत सुरक्षित प्रवेश देण्याचं काम करेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.