🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता अवघ्या ११ रुपयांत भरा ITR! 'या' अ‍ॅपवर मिळतोय मोठा फायदा; मोबाईलवरुन भरण्याची संपूर्ण प्रोसेस

आता अवघ्या ११ रुपयांत भरा ITR! 'या' अ‍ॅपवर मिळतोय मोठा फायदा; मोबाईलवरुन भरण्याची संपूर्ण प्रोसेस


प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. तुम्ही अद्याप तुमचा आयटीआर भरला नसेल तर शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. फिनटेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘पेटीएम’ने प्रसिद्ध टॅक्स पोर्टल ‘क्लियरटॅक्स’ सोबत एक नवीन ऑफर आणली आहे. पेटीएम युजर्स आता थेट आपल्या मोबाईल अ‍ॅपवरून केवळ ११ रुपयांच्या सुरुवातीच्या शुल्कात इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकणार आहेत. विशेष म्हणजे, या सुविधेत करदात्यांना नोटीस संरक्षण देखील मोफत दिले जात आहे.

अ‍ॅपवर आयटीआर फायलिंग कशी करावी?

तुमच्या स्मार्टफोनवरील पेटीएम अ‍ॅप ओपन करा आणि होम पेजवर खाली स्क्रोल करून ‘Free Tools’ सेक्शनमध्ये जा.

फ्री टूल्स सेक्शनमध्ये दिसणाऱ्या ‘File your ITR with ClearTax’ या पर्यायावर क्लिक करा.

तुमचा अधिकृत ईमेल आयडी एंटर करा. त्यानंतर तुमच्या ईमेलवर आलेला वन-टाईम पासवर्ड प्रविष्ट करून लॉगिन करा.

प्राप्तिकर विभागाच्या रेकॉर्डवरून तुमची माहिती आपोआप फॉर्ममध्ये येईल. सर्व तपशील तपासून अर्ज सबमिट करा.

या सुविधेचे फायदे काय आहेत?
प्राप्तिकर विभागाकडील माहितीच्या आधारे युजरचे तपशील आपोआप भरले जातात. करदात्यासाठी नवीन की जुनी कोणती टॅक्स रिजीम फायदेशीर आहे आणि कोणता आयटीआर फॉर्म योग्य आहे, हे अ‍ॅप स्वतःहून ठरवते. यामुळे मॅन्युअल डेटा एंट्रीचा त्रास वाचतो.

केवळ ११ रुपयांच्या बेसिक प्लॅनमध्येही ‘क्लियरटॅक्स’कडून मोफत नोटीस असिस्टन्स मिळेल. आयटीआर भरल्यानंतर आयकर विभागाकडून कोणतीही नोटीस आल्यास, ती नोटीस समजून घेणे, त्याला योग्य उत्तर तयार करणे आणि प्रकरण मार्गी लावेपर्यंत क्लियरटॅक्सचे तज्ज्ञ मदत करतील.

शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. युजर्स ८० हून अधिक ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवरून आपला ट्रेडिंग डेटा एका क्लिकवर इम्पोर्ट करू शकतात. जर एखाद्या ब्रोकरचे स्टेटमेंट फॉरमॅट बदलले, तरी क्लियरटॅक्सची प्रगत ‘एआय सिस्टीम’ ते बदल ओळखून डेटा प्रोसेसिंग अखंडपणे पूर्ण करते.
ऑनलाईन आयटीआर भरण्याचे तोटे आणि मर्यादा

हे पूर्णपणे स्वयंचलित आणि अ‍ॅप-आधारित प्लॅटफॉर्म आहे. येथे तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट थेट बसून वैयक्तिक सल्ला देत नाही. कर बचतीसाठी कोणत्या तरतुदींचा वापर करावा याबाबतचे वैयक्तिक मार्गदर्शन मिळण्यात मर्यादा येतात. आयटीआर भरताना तुमचा पॅन कार्ड नंबर, बँक खात्याचा तपशील, पगाराची माहिती, फॉर्म १६ आणि गुंतवणुकीची अत्यंत संवेदनशील माहिती थर्ड-पार्टी अ‍ॅपसोबत शेअर होते.

आर्थिक माहिती अ‍ॅप्स आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्मशी लिंक करताना डेटा लीक किंवा प्रायव्हसीचा धोका नेहमी असतो. अ‍ॅपद्वारे प्राप्तिकर विभागाच्या माहितीवरून ऑटो-फिल केलेला डेटा नेहमीच १००% अचूक असतो असे नाही.

फॉर्म २६एएस (Form 26AS) किंवा एआयएस (AIS) मधील माहिती आणि तुमच्या प्रत्यक्ष उत्पन्नात तफावत असल्यास आणि तुम्ही ती न तपासता सबमिट केली, तर आयकर विभागाकडून चुकीच्या माहितीसाठी नोटीस येऊ शकते.

आयटीआर भरण्याची अंतिम मुदत
वित्तीय वर्ष २०२५-२६ साठी विनादंड आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. ज्या पगारदार कर्मचाऱ्यांचे, पेन्शनधारकांचे किंवा इतर व्यक्तिगत करदात्यांचे खाते ऑडिट करणे बंधनकारक नाही, त्यांनी वेळेत आयटीआर भरणे आवश्यक आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.