🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कायद्याच्या रक्षकाचंच कृत्य! लग्नाचं आमिष दाखवून PSI कडून तरुणीवर अत्याचार; जातीचं कारण देत झटकला हात

कायद्याच्या रक्षकाचंच कृत्य! लग्नाचं आमिष दाखवून PSI कडून तरुणीवर अत्याचार; जातीचं कारण देत झटकला हात


एका पोलीस उपनिरीक्षकाची प्रेम कहाणी आणि त्याने केलेली फसवणूक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पोलीस उपनिरीक्षक कुंदन कृष्णा याच्यावर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. पीडितेने शुक्रवारी (17 जुलै) संध्याकाळी थेट पोलीस अधीक्षकांची  भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची आणि आरोपी पोलिसावर कडक कारवाई करण्याची मागणी करत लेखी अर्ज दाखल केला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. बिहारमधील जमुई येथील ही घटना आहे.

फेसबुकवरुन ओळख, हॉटेल्समध्ये शारीरिक संबंध
पीडित तरुणीने अर्जात नमूद केल्यानुसार, सुमारे एका वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून तिची आणि कुंदन कृष्णाची ओळख झाली होती. हळूहळू त्यांच्यात संवाद वाढला आणि या ओळखीचे रूपांतर प्रेम संबंधात झाले. प्रेमाची कबुली दिल्यानंतर, दोघांनी चालू वर्षात म्हणजेच 13 फेब्रुवारी 2026 रोजी मुंगेर येथील प्रसिद्ध चंडिका स्थान मंदिरात लग्न केले होते. मात्र, लग्नानंतरही कुंदन तिला सोबत ठेवण्यास टाळाटाळ करत होता आणि मुंगेर तसेच बेगुसराय येथील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये बोलावून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. जेव्हा तिने एकत्र राहण्याचा हट्ट केला, तेव्हा भाड्याने घर घेतल्यानंतर कायमचे सोबत ठेवण्याचे आश्वासन देऊन तो गेल्या सहा महिन्यांपासून तिचे शोषण करत होता.
पाच लाख देतो, निघून जा...

कुंदन कृष्णाची जमुई जिल्ह्यातील चंद्रदीप पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर पीडिता त्याला शोधत तिथे पोहोचली. सुरुवातीला त्याने तिला आपल्या भाड्याच्या खोलीत सोबत ठेवले, मात्र काही दिवसांतच त्याचा रंग बदलला. आपण दोघे एकाच जातीचे नसल्यामुळे एकत्र राहणे शक्य नाही, असे सांगत त्याने तिला पाच लाख रुपये घेऊन निघून जाण्यास सांगितले. जेव्हा पीडितेने या गोष्टीला तीव्र विरोध केला, तेव्हा तिला जबरदस्तीने चंद्रदीप पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे तिला धमकावण्यात आले, तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनीही तिच्याशी गैरवर्तन करत तिला तिथून हाकलून दिले, असा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे.

PSI ने आरोप फेटाळले
या संपूर्ण प्रकरणावर आरोपी पोलीस उपनिरीक्षक कुंदन कृष्णा याने आपली बाजू मांडताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण संबंधित तरुणीशी कोणतेही लग्न केले नसून, तिने केलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असा दावा त्याने केला आहे. तसेच सध्या आपली प्रकृती ठीक नसल्यामुळे याविषयी अधिक काही बोलू शकत नाही, असे सांगत त्याने मौन बाळगले आहे. दरम्यान, पीडित तरुणीने पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आपल्याला न्याय देण्याची विनवणी केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.