Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

TCS प्रकरण: आरोपी निधा खानला अखेर जामीन मंजूर; लवकरच कारागृहाबाहेर येणार

TCS प्रकरण: आरोपी निधा खानला अखेर जामीन मंजूर; लवकरच कारागृहाबाहेर येणार


नाशिक : कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना कशा प्रकारे अत्याचार आणि धर्मांतर करण्याचा प्रकार होतो आणि तेही देशातील प्रतिष्ठीत TSC अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये घडल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातली संशयित आरोपी पैकी एक असलेल्या निधा खान हिला अखेर दिलासा मिळाला आहे. निधा खान हिला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर दानिश शेख याचा जामीन फेटाळला आहे. टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी मागील काही दिवसांपासून सगळे आरोपी हे नाशिकच्या जेलमध्ये मुक्कामी आहे. 

संशयित आरोपी निधा खान हिला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. पण, यावेळी न्यायालयाने निधा खानला जामीन मंजूर केला आहे. तर निदा खानसह तौसीफ अत्तार याला देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण, दानिश शेख यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मागील आठवड्यात आरोपींनी जामिनासाठी प्रयत्न केला होता. पण, त्यावेळी जामीन फेटाळला होता. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी, अश्विनी चेनानी आणि रजा मेमन या आरोपींचा जामीन फेटाळला होता.
निधाकडून धक्कादायक कबुली

दरम्यान, टीसीएसमधील कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. "होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे रीतसर प्रशिक्षण दिले होते" अशी कबुली निधाने चौकशीत दिली. तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहे. सर्व गुन्हा संदर्भात नाशिक पोलिसांनी दोषारोप पत्र देखील दाखल केलं आहे.

निधा खानवर आरोप काय?
निधा ही एचआर मॅनेजर म्हणून काम करत होती. तिच्यावर पीडित महिला कर्मचाऱ्यांनी मानसिक तणावर आणि व्यक्तिगत अडचणींचा फायदा धेऊन ब्रेनवॉश केल्याचा आरोप केला आहे. पीडितेला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. एवढंच नाहीतर पीडितला विशिष्ट धार्मिक एॅप्स इन्स्टॉल करून दिले, नमाज पठण शिकवलं. पीडित महिलेला बुरखा, हिजाब पुरवला होता. एवढंच नाहीतर इस्लामिक धार्मिक पुस्तकंही निधाने पीडितेला पुरवली होती. पीडितेचं नाव हानिया असं करण्याचा प्रयत्नही तिने केला. यासाठी कागदपत्र गोळा करण्याचं कामही केलं, असल्याचा आरोप चार्जशिटमध्ये आहे. मॅनेजरपदावर असलेल्या निधाने अनेक टीएसीएसमध्ये अनेक हिंदू कर्मचाऱ्यांना टार्गेट करून त्रास देत असल्याचा आरोपही करण्यात आला. प्रकरण समोर आल्यानंतर निधा ही फरार झाली होती. जवळपास २५ दिवस ती गायब होती. अखेरीस नाशिक एसआयटीच्या टीमने तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.