🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर ठरलं? 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? CM फडणवीसांबाबत मोठी माहिती समोर;दिल्लीत

अखेर ठरलं? 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? CM फडणवीसांबाबत मोठी माहिती समोर; दिल्लीत.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संपूर्ण देशात चर्चा आहे. अशातच आता या विस्ताराची तारीख समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

यात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण खात्याची जबाबदारी कोणत्या नेत्याला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का? या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तरही 21 ऑगस्टला मिळणार आहे.

21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता

समोर आलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 2024 साली मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा एकदाही विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्ताराकडे देशाचं लक्ष लागले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक प्रश्न समोर येत आहेत. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या धर्मेंद्र प्रधानांची कॅबिनेटमध्ये पुन्हा एन्ट्री होणार का? हा आहे. विद्यार्थी आंदोलनामुळं राजीनामा द्यावा लागलेल्या धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार की महाराष्ट्रातच राहणार? या प्रश्नाचेही उत्तर समोर येणार आहे.

फडणवीस दिल्लीत?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जात पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमण आणि भूपेंद्र यादव यांनाही भेटले. त्यामुळं फडणवीस केंद्रात जाणार की महाराष्ट्रातच राहणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र केंद्रात जाण्याच्या चर्चांचं फडणवीसांनी खंडन केलं आहे, मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.


दरम्यान, पियूष गोयल यांचं वाणिज्य मंत्रालय जाणार की राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर गजेंद्रसिंह शेखावत यांचं पर्यटन मंत्रालय जाणार की राहणार? याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कारण पर्यटन मंत्रालय पंतप्रधान स्वत:जवळ ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.