🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता राज्याच्या प्रशासनात उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. राजकीय वरदहस्तामुळे दीर्घकाळ एकाच विभागात प्रभाव निर्माण केलेल्या अधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर आल्याची चर्चा आहे.

राज्यातील शेकडो अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाची करडी नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे राज्याच्या प्रशासनात फेरबदल करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून काय हालचाली सुरू आहेत ते पाहूयात...


मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्रालय आणि विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा आढावा घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. कोणता अधिकारी किती वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत आहे? कोणत्या पदावर आहे? आणि त्याची बदली किती काळापासून प्रलंबित आहे? याची माहिती संकलित करण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या सुमारे 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर आल्याची माहिती आहे. या अधिकाऱ्यांना सध्याच्या विभागातून इतर विभागांमध्ये हलवण्याच्या हालचालींना वेग आलाय. त्यामुळे येत्या काळात मंत्रालयासह विविध शासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, मंत्रालयातील विविध विभागांसह मंत्रालयाबाहेरील महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत आहेत. काही अधिकारी तर जवळपास दहा वर्षांपासून त्याच विभागात महत्त्वाच्या पदावर असल्याचं समोर आलंय. त्यामुळे प्रशासनात दीर्घकाळ एकाच विभागात असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या हितसंबंधांच्या साखळीवरही प्रश्न उपस्थित झालेत.

खरंतर,याआधी मुख्यमंत्री कार्यालयानं मंत्री आस्थापनेवर अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या खासगी सचिव आणि OSD यांच्याबाबतही कठोर भूमिका घेत अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर आता मंत्रालयातील प्रशासकीय यंत्रणेच्या इतर स्तरांकडेही मुख्यमंत्र्यांनी मोर्चा वळवल्याचं दिसतंय...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.