🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"आमदार-खासदार विकत घ्यायला खोके, अन् मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला नियमांचे ढोके!" – अभिजीत दिपके यांचा घणाघात

"आमदार-खासदार विकत घ्यायला खोके, अन् मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला नियमांचे ढोके!" – अभिजीत दिपके यांचा घणाघात

नीट पेपरफुटीविरोधात जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाची तुलना नेपाळ आणि बांगलादेशमध्ये तरुणांनी केलेल्या उठावाशी करणे हे कॉक्रोच जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असे मत अभिजीत दिपकेंनी मांडले.

आम्ही वेगळे आहोत, असेही दिपके पुढे म्हणाले. सीजेपीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी या आंदोलनामुळे बांगलादेशातील उठावाची आठवण झाल्याचे मत मांडले होते.

तस्लिमा नसरीन यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन बऱ्याच वर्षांनी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्यांनी नीट पेपरफुटीविरोधात जंतर मंतरवर झालेल्या सीजेपीच्या आंदोलनाबाबत विचारण्यात आले. यावेळी त्यांनी आंदोलनाची फारसी कल्पना नाही मात्र, एक व्हिडीओ पाहिल्यानंतर मला २०२४ मध्ये बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची आठवण झाली. या आंदोलनानंतर शेख हसीना यांचे सरकार पडले होते.

"बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलनाने आम्हाला मूर्खात काढले. कारण आम्हाला असं वाटलं की विद्यार्थी आरक्षणाच्या विरोधात आहेत. शेख हसीना यांनी देखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. पण, सरकार अयशस्वी ठरले. त्यानंतर या आंदोलनाच्या मागे जिहादी शक्ती असल्याचे आढळून आले. बांगलादेशमध्ये सरकारचा पाडाव योग्य नव्हता, तिथं जिहादी लोकं सत्तेत आलेत", असे तस्लिमा नसरीन यांनी पीटीआयशी बोलताना म्हणाल्या.

पुन्हा आंदोलनाचा इशारा

नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीने केली होती. पण, सरकारने ही मागणी मान्य न केल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा अभिजीत दिपकेंनी दिला आहे. सीजेपीने आंदोलन मागे घेताना देखील सरकारने मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले होते. "सरकारने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा, आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल", असे दिपके एएनआयशी बोलताना म्हणाले.


खासदार-आमदार विकत घ्यायला करोडो रुपये असतात, पण… - दिपके

"आम्ही प्रत्येक कुटुंबियांसाठी एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. पण, अद्याप कोणालाच नुकसान भरपाई मिळालेली नाही. सरकारने नियम आणि कायदा पाहून निर्णय घेऊ असे म्हटले आहे. खासदार-आमदार विकत घ्यायला करोडो रुपये असतात, पण आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देताना नियम बघतात. याचा अर्थ हेतू योग्य नाही", असे अभिजीत दिपके म्हणाले.

प्रल्हाद जोशींच्या निवडीला समर्थन नाही - दिपके

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी शिक्षणमंत्री म्हणून करण्यात आलेली निवडीचे आम्ही समर्थन करत नाही, असेही अभिजीत दिपके म्हणाले. प्रधान यांच्या जागी कोणाला शिक्षणमंत्री करण्यात आले? प्रल्हाद जोशी, ते बिल्किस बानो यांच्या बलात्काऱ्यांचे समर्थन करताना दिसून आले. शालेय विद्यार्थिनींना काय वाटेल? आम्ही या निवडीचे समर्थन करत नाही, असे दिपके म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.