🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा दणका! तब्बल पावणेदोन कोटींचा ३०० किलो गांजा हस्तगत; सांगली एलसीबीची महामार्गावर धडक कारवाई!​

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा दणका! तब्बल पावणेदोन कोटींचा ३०० किलो गांजा हस्तगत; सांगली एलसीबीची महामार्गावर धडक कारवाई!


सांगली :- सांगली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  धडक मोहीम उघडली आहे. मिरज-पंढरपूर महामार्गावर तानंग फाटा ते मालगाव रस्त्यावर सापळा रचून एलसीबीच्या पथकाने तब्बल १ कोटी ७५ लाख १० हजार रुपये किमतीचा ३०० किलो गांजा आणि सहाचाकी कंटेनर जप्त केला आहे. या कारवाईत एका तस्कराला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

​कारवाईचा सविस्तर तपशील
​अटक आरोपी: मंगेश प्रकाश मोरे (वय ४६, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा).
​जप्त केलेला मुद्देमाल:

​गांजा: १ कोटी ५० लाख रुपये किमतीचा (अंदाजे ३०० किलो वजनाचे १५० खाकी रंगाचे पॅकेट्स, प्रति किलो ५०,००० रुपये दर).

​वाहने व इतर वस्तू: २५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड सहाचाकी कंटेनर (क्र. NL-01-AD-9366) आणि १०,००० रुपयांचा मोबाईल.

​एकूण जप्त मुद्देमाल: ₹१,७५,१०,०००/-
ओडिशा ते पुणे तस्करीचा कट उधळला

पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांचे पथक अंमली पदार्थ तस्करांचा शोध घेत होते. २० ऑगस्ट २०२६ रोजी गोपनीय बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की, संशयित मंगेश मोरे हा कंटेनरमधून गांजाची वाहतूक करत मिरज-पंढरपूर रस्त्यावरून जात आहे.
​माहिती मिळताच पथकाने तानंग फाटा ते मालगाव रस्त्यावर तातडीने छापा टाकला. कंटेनरची तपासणी केली असता ड्रायव्हर केबिनमधील विशेष कप्प्यामध्ये २ किलो वजनाचे १५० खाकी रंगाचे चिकटपट्टीने गुंडाळलेले गांजाचे पॅकेट्स मिळून आले.
आरोपीकडे कसून चौकशी केली असता, हा गांजा त्याने ओडिशा राज्यातील बालेगोडा ते तुंम्बडी दरम्यानच्या एका शेतातून आणला असून तो पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायदयातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गांजा नक्की कोणाला विकला जाणार होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
​सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार, सपोफौ सुभाष सूर्यवंशी, पोहेकॉ सागर लवटे, संदीप गुरव, अतुल माने, अनिल कोळेकर आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.