🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संपत्ती दिली नाही, आम्ही कशाला येऊ? वृद्धाश्रमात वडिलांचा मृत्यू; चारही मुलांची अंत्यविधीकडे पाठ

संपत्ती दिली नाही, आम्ही कशाला येऊ? वृद्धाश्रमात वडिलांचा मृत्यू; चारही मुलांची अंत्यविधीकडे पाठ


भोपाळ: अतिशय बिकट परिस्थितीत चार मुलांना मोठं करणाऱ्या वडिलांकडे त्यांच्या मुलांनी पाठ फिरवली. अर्धांगवायूचा झटका आल्यानं वडिलांची प्रकृती बिघडली. मुलं सुखी व्हावीत, त्यांना आपलासारखा संघर्ष करावा लागू नये यासाठी बापानं आपला देह आयुष्यभर झिजवला. 

पण त्याच बापाकडे पाहायला मुलांना वेळ मिळाला नाही. जिवंतपणी मुलं कधी वडिलांना पाहायला आली नाहीत. पण मृ्त्यूनंतरही त्यांनी वडिलांकडे पाठ फिरवली. वृद्ध बापाचा देह २ दिवस लेकरांची वाट पाहात होता. पण जन्मदात्याचं अखेरचं दर्शन घ्यायला एकही जण आला नाही.

मध्य प्रदेशच्या भोपाळमधील 'अपना घर' वृद्धाश्रमात ७० वर्षांच्या घनश्याम यांनी अखेरचा श्वास घेतला. आयुष्याची शेवटची ४ वर्षे त्यांनी अपना घरमध्ये घालवली. त्यांची २ मुलं आणि २ मुलं इंदूरमध्ये असतात. यातील कोणीही ना त्यांना पाहायला आलं, ना त्यांच्या पार्थिवाला खांदा द्यायला. काबाडकष्ट करुन मुलांना शिकवणाऱ्या घनश्याम यांना अखेरच्या काही वर्षांत मरणयातना सहन कराव्या लागल्या. पोटच्या मुलांचा चेहराही त्यांना पाहता आला नाही.

घनश्याम यांचा इंदूरमध्ये सायकलच्या टायर ट्यूबचा लहानसा व्यवसाय होता. एक लहानसं घरं होतं. पत्नीनं जग सोडलं, तेव्हा घनश्याम यांची सर्वात लहान मुलगी दोन वर्षांची होती. तेव्हापासून घनश्यान हेच मुलांची आई झाले. त्यांना आई-बाप अशा दोघांचंही प्रेम दिलं. स्वत:च्या गरजांकडे दुर्लक्ष करून मुलांना कष्टानं मोठं केलं. 
घनश्याम यांनी रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवलं. मुलं आपापल्या पायांवर उभी राहिली. घनश्याम यांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला. त्यांना चालणं-फिरणं जमेनासं झालं. तेव्हा त्यांना सांभाळण्यासाठी चार मुलांपैकी कोणीही पुढे आलं नाही. घनश्याम स्वत: भोपाळच्या आयएसबीटी बस स्टँडपर्यंत पोहोचले. तेव्हा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पाहिलं. त्यांनी घनश्याम यांना अपना घर वृद्धाश्रमात नेलं.
वृद्धाश्रमाच्या संचालिका माधुरी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम यांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी एक फोन नंबर दिला होता. त्यांच्या निधनानंतर त्या नंबरवर फोन केला. दोन दिवस संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. पण कोणीच प्रतिसाद दिला नाही. ४ ऑगस्टला घनश्याम यांनी अखेरचा श्वास घेतला. इंदूरवरून त्यांची मुलं येतील, असं आम्हाला वाटलं. पण कोणीही आलं नाही. शव दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था नसल्यानं पोलिसांच्या मदतीनं अंत्यविधी करण्यात आले.
घनश्याम यांच्या संपत्तीच्या वाटपावरुन मुलांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं निरीक्षण माधुरी मिश्रा यांनी नोंदवलं. वडिलांनी सगळी संपत्ती मुलांना दिली. मग त्यांच्या अंत्यविधीला आम्ही का यायचं, असं मुलींचं म्हणणं होतं. तर वडिलांनी आमच्यासाठी केलंच काय, असा मुलांचा प्रश्न होता, असं मिश्रा यांनी सांगितलं. जिवंतपणी आणि मृत्यूनंतर जन्मदात्यांकडे पाठ फिरवणाऱ्या मुलांवर बहिष्कार घालायला हवा, असा विचार त्यांनी बोलून दाखवला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.