🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"धक्कादायक! हिंगोलीत सफाई कर्मचाऱ्याला एकाच महिन्याचं तब्बल २.१८ लाखांचं वीजबिल; महावितरणच्या कारभारावर संताप!"

"धक्कादायक! हिंगोलीत सफाई कर्मचाऱ्याला एकाच महिन्याचं तब्बल २.१८ लाखांचं वीजबिल; महावितरणच्या कारभारावर संताप!"


वीज बिलामध्ये पारदर्शकता यावी, वाढीव बिलांचा त्रास दूर व्हावा, यासाठी महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा रेटा करण्यात आला. मात्र, स्मार्ट मीटर नागरिकांना चांगलाच मोठा झटका बसत आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्मार्ट मीटर नागरिकांच्या सोयीसाठी, हितासाठीच असल्याचे म्हटले होते. मात्र, नागरिकांना स्मार्ट झटका बसताना दिसून येत आहे. नागरिकांना वीजबिल अव्वाच्या सव्वा येत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. हिंगोलीमधील एका महिलेला तर दोन लाख रुपयांचं बील महावितरण कंपनीनं पाठवलंय.

हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशनवर साफसफाईचे काम करणाऱ्या एका महिलेला चक्क दोन महिन्यांचं वीज बिल तब्बल 2 लाख 18 हजार रुपये आलंय. प्रभावती सिद्धार्थ श्रावने असे या महिलेचे नाव आहे. त्या हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत. रेल्वे स्टेशनवर दरमहा 8 ते साडेआठ हजार रुपये पगारावर त्या साफसफाईेचे काम करतात.
आधी दर महिन्याला 700 ते 800 रुपये वीजबिल येत असल्याचे प्रभावती श्रावणे या महिलेने सांगितलं. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अचानक 2 लाख 18 हजार रुपये भरा असा वीज वितरण कार्यालयाचा मेसेज श्रावणे यांना आला. वीजबिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी दोन लाख 18 हजार रुपयांमध्ये काही प्रमाणात रक्कम कमी केली, मात्र आपल्याला दरमहा साडेआठ हजार रुपये महिना आहे तर माझ्या घरातील विजेच्या वापराचे नेहमी सातशे ते आठशे रुपये बिल येत असते. मग अचानक दोन लाख रुपयांचे बिल आल्यानं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. 
गंभीर बाब म्हणजे तातडीने वीज देयक भरा अन्यथा घराचा वीज पुरवठा खंडित करू असा संदेश मिळत असल्याने ही महिला वैतागलीय. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलामध्ये पारदर्शकता येईल. ग्राहकांना वाढीव बिलांचा त्रास होणार नाही, असा दावा महावितरणकडून करण्यात आला होता. सिद्धार्थनगरमधील या घटनेमुळे स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही बिलांचा गोंधळ कायम असल्याच चित्र आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.