🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप नेत्याची सून आढळली मृतावस्थेत, पतीचे दुसऱ्या तरुणीशी अनैतिक संबंध, अंतर्वस्त्रात लपवली होती चिठ्ठी

भाजप नेत्याची सून आढळली मृतावस्थेत, पतीचे दुसऱ्या तरुणीशी अनैतिक संबंध, अंतर्वस्त्रात लपवली होती चिठ्ठी


भाजपच्या एका नेत्याच्या सुनेनं राहत्या घरात जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका राजकीय नेत्याच्या सुनेनं अशाप्रकारे जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून महिलेनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि त्याच्या कथित प्रेयसीला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे ?
निधी सिंह असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे. त्या सूरत शहरातील स्थानिक महिला नेत्या शशी सिंह यांच्या सून होत्या. त्या पळसाणा येथील कडोदरा भागात असलेल्या श्रीनिवास सोसायटीत सासरच्या कुटुंबासोबत राहत होत्या. सुरुवातीला या आत्महत्येबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. कुटुंबीयांना या मृत्यूमागे काहीतरी मोठं कारस्थान असल्याचा संशय होता. त्यामुळे निधीच्या मृतदेहाचे 'पॅनेल पोस्टमार्टम' करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती.
पोस्टमार्टम दरम्यान सापडली सुसाईड नोट

पोस्टमार्टम प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना निधीच्या अंतर्वस्त्रात दडवलेली एक सुसाईड नोट आढळून आली. या एका सुसाईड नोटमुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. या चिठ्ठीत निधीने तिच्या पतीने केलेल्या मानसिक छळाचा आणि अनैतिक संबंधाचा सविस्तर उल्लेख केल्याचं समोर आलं आहे.

पती आणि प्रेयसीवर गुन्हा दाखल
सुसाईड नोटमधील मजकुराच्या आधारे निधीचा भाऊ याने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पतीने एका दुसऱ्या युवतीसोबत ठेवलेल्या अनैतिक संबंधांमुळे निधी प्रचंड मानसिक त्रासातून जात होती आणि याच त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीवरून कडोदरा पोलिसांनी निधीचा पती सौरभ आणि त्याची कथित प्रेयसी इशिका बॅनर्जी या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फक्त तक्रारीच्या आधारेच नव्हे, तर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि प्राथमिक तपासात हाती आलेल्या महत्त्वाच्या पुराव्यांची दखल घेत दोन्ही आरोपींना तत्काळ अटक केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.