🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: कसबे डिग्रज येथे साडेचार कोटींचे ‘अंबरग्रीस’ जप्त; कोल्हापूरच्या संशयिताला बेड्या​

सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: कसबे डिग्रज येथे साडेचार कोटींचे ‘अंबरग्रीस’ जप्त; कोल्हापूरच्या संशयिताला बेड्या


सांगली :- सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने कसबे डिग्रज (ता. मिरज) हद्दीत छापा टाकून व्हेल माशाची बंदीत उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ४ किलो ५२१ ग्रॅम वजनाचे सुमारे ४ कोटी ५२ लाख १० हजार रुपयांचे अंबरग्रीस आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

​काय घडली घटना?

दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास कसबे डिग्रज येथील बागणवाट रोडवर, शक्ती पॉलिमर्स कंपनीच्या दक्षिण बाजूला ग्रिन पार्क प्लॉटींगजवळ एक संशयित इसम बंदी घातलेल्या अंबरग्रीसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.

​या कारवाईत अमोल आकाराम सिद (वय ३२, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्र. MH 09 FD 7268) वरून आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड किंमत असलेले ४,५२,१०,००० रुपये मूल्याचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान हे अंबरग्रीस त्याला निखिल (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग) याने दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस कोठडी मंजूर
या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात महेश भुपाल जाधव (पोहेका/१८८३) यांच्या फिर्यादीवरून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा (रजि. नं. २४९/२०२६) दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख करत आहेत.
ही कामगिरी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बाचरकर, आणि मिरज विभागाचे एसडीपीओ अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, पोउपनि शिवाजी देशमुख, ग्रेड पोउपनि अरुण औताडे, सपोफि मेघराज रुपनर, पोहेका सचिन खाडे, पोहेका महेश जाधव, पोहेका अभिजित पाटील, पोका हिम्मत शेख, पोका योगेश यादव, पोका अमित पाटील तसेच वनविभागाचे वनरक्षक गणेश भोसले व वनपाल सुधीर सोनवले यांच्या पथकाने केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.