मुंबई :- महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला असून, महागाई भत्त्यात (DA) २% वाढ जाहीर केली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) वित्त विभागाकडून १८ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
शासकीय निर्णयातील प्रमुख मुद्दे:
महागाई भत्त्यात वाढ: ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर ५८% वरून ६०% करण्यात आला आहे.लागू होणारी तारीख: ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू मानली जाईल.७ महिन्यांची थकबाकी: जानेवारी २०२६ ते जुलै २०२६ या ७ महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीचा (Arrears) फरक कर्मचाऱ्यांना दिला जाईल.रोख रक्कम वितरण: महागाई भत्त्याची ही २% वाढ आणि ७ महिन्यांची थकबाकी माहे ऑगस्ट २०२६ च्या वेतनासोबत रोखीने दिली जाणार आहे.लाभार्थी: या निर्णयाचा लाभ सर्व राज्य शासकीय कर्मचारी, अनुदानप्राप्त संस्थांमधील कर्मचारी आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना होणार आहे.महागाई भत्त्याची रक्कम अदा करण्याची सध्याची कार्यपद्धती व तरतुदी यापुढेही तशाच लागू राहतील. या निर्णयामुळे ऐन सणासुदीच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशाला मोठा दिलासा मिळाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.