🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हिंगोली :- पोलीस उपनिरीक्षकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

हिंगोली :- पोलीस उपनिरीक्षकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या, पोलीस दलात खळबळ


हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अमोल गांगणवाड यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अमोल गांगणवाड हे हिंगोली पोलीस नियंत्रण कक्षात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आपले जीवन संपवले, हे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. 
गांगणवाड यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून गांगणवाड यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे हिंगोली पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.