🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुपवाड हत्येचा तीव्र निषेध; आरोपीला फाशी व खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची आमदार सुधीर गाडगीळ यांची मागणी

कुपवाड हत्येचा तीव्र निषेध; आरोपीला फाशी व खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची आमदार सुधीर गाडगीळ यांची मागणी


सांगली 18 ऑगस्ट 2026 : श्यामनगर, कुपवाड येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष घटनेत मनीषाताई केसरेकर यांच्यापाठोपाठ, मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणारे त्यांचे पती मोहन केसरेकर यांचेही आज दुर्दैवी निधन झाले. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना अशा अत्यंत दुर्दैवी व निर्घृण पद्धतीने गमावण्याची ही घटना अत्यंत संतापजनक, वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे. या दुर्दैवी घटनेचा सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.  

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि पोलीस प्रशासनाशी तातडीने संवाद साधला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रशासनाकडे  या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी व हा खटला तातडीने फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा. 

अमानुष कृत्यातील दोषी आरोपीला कायद्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी ठाम मागणी आमदार गाडगीळ यांनी केली आहे. तसेच दुर्दैवी प्रसंगी केसरेकर कुटुंबातील मुलांच्या भवितव्याची पूर्ण जबाबदारी घेण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील आणि मी स्वतः सर्वतोपरी प्रयत्न करू, असा खंबीर विश्वास आमदार सुधीर गाडगीळ यांनी पीडित कुटुंबीयांना दिला आहे. केसरेकर कुटुंबीयांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि दोषीला कडक शिक्षा होईपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा पुनरुच्चार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.