🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भीमशक्ती संघटनेचा सांगलीत तीव्र निषेध: खरगे यांच्या सभेच्या मंचावर गोमूत्र शिंपडणाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

भीमशक्ती संघटनेचा सांगलीत तीव्र निषेध: खरगे यांच्या सभेच्या मंचावर गोमूत्र शिंपडणाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


सांगली :- उत्तराखंड येथील हळद्वानी स्थित रामलीला मैदानावरील सभेच्या मंचावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सांगलीत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, दोषींवर कडक कारवाई न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ​माजी मंत्री तथा राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. सांगलीत भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ माने यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येत घटनेचा जोरदार जाहीर निषेध केला.


​निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे अनुसूचित जाती (SC) समाजाचे असल्याने, सभा संपल्यानंतर काही जातीवादी मनोवृत्तीच्या व्यक्ती व संघटनांनी मंचावर जाऊन गोमूत्र शिंपडले आणि मंत्रपठण करून तथाकथित शुद्धीकरण केले. या प्रकारामुळे समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असून, देशभरातील व राज्यातील अनुसूचित जाती-जमातींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 

​या कृत्यात सहभागी असलेल्या संबंधित व्यक्ती आणि संघटनांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍क्ट) अंतर्गत सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सुरुवातीला मुंडन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असला तरी प्रशासनाला निवेदन देऊन पुढील कारवाईकडे लक्ष वेधण्यात आले आहे. राज्य सरकारने या विषयाची गंभीर दखल न घेतल्यास भविष्यात अधिक व्यापक आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.