🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुनिता काळे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली शहर कार्याध्यक्षपदी निवड; पक्षसंघटन बळकट करण्याचा संकल्प

सुनिता काळे यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली शहर कार्याध्यक्षपदी निवड; पक्षसंघटन बळकट करण्याचा संकल्प


सांगली :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचा विस्तार आणि संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सांगली शहरातील अभयनगर येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या सुनिता नवनाथ काळे यांची 'राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सांगली शहर कार्याध्यक्षपदी' अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. 

​या निवडीचे पत्र पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सुनिता काळे यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. पत्राद्वारे पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास व्यक्त करताना म्हटले आहे की, राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या विचारांना आणि नेतृत्वाला अभिप्रेत असणारे भक्कम पक्षसंघटन सांगली शहरात उभे करण्यासाठी त्या कटिबद्ध राहतील. तसेच, पक्षाची ध्येय-धोरणे, जनकल्याणकारी योजना आणि विचारसरणी तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षवाढीसाठी त्या मोलाचे सहकार्य करतील, असा सार्थ विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला आहे. 

आपल्या या नियुक्तीबद्दल सुनिता काळे यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले असून, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी व सांगली शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी तत्परतेने कार्य करणार असल्याचे सांगितले.

​दरम्यान, सुनिता काळे यांच्या या महत्त्वाच्या निवडीबद्दल सांगली शहर व परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भावी सामाजिक व राजकीय वाटचालीस उत्स्फूर्त शुभेच्छा दिल्या जात आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.