राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भातएकमोठीअपडेटसमोरआलीआहे. यायोजनेअंतर्गत 94 हजार प्राप्तिकर भरणारे शेतकरी अपात्र ठरले असल्याची माहि ती आहे . राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026' अंतर्गत सहकार विभागाने या योजनेतील उर्वरित 16 लाख 94 हजार पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या जमा केले जाणार असल्याची माहिती आहे . उद्या म्हणजेच मंगळवारी (4 ऑगस्ट ) एकाचवेळी सात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात जमा होणार असल्याची माहिती सहकार विभागील सूत्रांनी दिली आहे . त्यामुळे या शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे चित्र आहे .
एकाचवेळी सात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात जमा होणार
दरम्यान, राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत आहे, त्यांना दोन लाखांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याची तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे दोन लाखपिक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्शाची दोन लाखांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर एकवेळ समझोता अंतर्गत त्यांच्याही कर्ज खात्यात सरकार दोन लाख रुपये जमा करणार आहे. या योजनेनुसार पहिल्या टप्यात दोन लाखांच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांची यादी सरकारने छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठविली होती.त्यात 94 हजार शेतकरी आढळून आले असून आता त्यांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. तर उर्वरित 16 लाख 96 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहीती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत भंडारा जिल्ह्यातील २२ हजार ३६५ शेतकरी पात्र झालेत. या शेतकऱ्यांना १३७ कोटी १३ लाख ३३ हजार रुपयांची ही कर्जमाफी मिळाली आहे. दरम्यान, पात्र लाभार्थ्यांपैकी ७५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिली. जिल्हा बँकेतील २३ हजार ६५५ कर्जखाते व राष्ट्रीयकृत, खाजगी व ग्रामीण बँकेचे ६ हजार ९३९ कर्जखाते अशा ३० हजार ५९४ कर्जखात्यांची माहिती या योजनेसाठी महाआयटी मार्फत विकसीत केलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.