🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विश्रामबागमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसांसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद​

विश्रामबागमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; १ देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसांसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
सांगली :-जिल्ह्यातील अवैध शस्त्रास्त्रे आणि गंभीर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष कारवाई करत एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून ६२,००० रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
​मधुसुदन महेश मगदूम (वय २४, रा. गल्ली नंबर ०६, हसनी आश्रम, विश्रामबाग, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

​गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून कारवाई

​पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांचे पथक जुना धामणी रोड परिसरात गस्त घालत होते.

​यादरम्यान पोहेकॉ रणजित जाधव यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी मधुसुदन मगदूम हा जुना धामणी रोड येथे कमरेला पिस्टल खोचून थांबला आहे. माहिती मिळताच पथकाने परिसरात सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

​६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

​पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपीच्या डाव्या बाजूला पँटमध्ये खोचलेले ६०,००० रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्टल आणि पँटच्या खिशात २,००० रुपये किमतीची २ जिवंत काडतुसे (एकूण ६२,००० रुपये) मिळून आली. परवान्याबाबत विचारणा केली असता आरोपीकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

​या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभिजीत सद्‌गुरू माळकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा (आर्म्स अॅक्ट) कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), (३)/१३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
​सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस अंमलदार रणजीत जाधव, अतुल माने, प्रकाश पाटील, संदीप पाटील, श्रीधर बागडी, अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, केरुबा चव्हाण, सुरज थोरात, विनायक सनदी तसेच सांगली सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर यांच्या पथकाने केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.