🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण इम्पॅक्ट :- सरपंचाचा कारनामा अन् 'वडापाव'ची लुडबूड! स्टेट बँक मॅनेजरच्या घरातील चोरीप्रकरणी अंकलीचे सरपंच राहुल पाटील अटकेत; ५ तोळे सोने जप्त, जामिनावर सुटका​

सांगली दर्पण इम्पॅक्ट :- सरपंचाचा कारनामा अन् 'वडापाव'ची लुडबूड! स्टेट बँक मॅनेजरच्या घरातील चोरीप्रकरणी अंकलीचे सरपंच राहुल पाटील अटकेत; ५ तोळे सोने जप्त, जामिनावर सुटका


सांगली :- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरच्या सांगलीतील बंद घरात पडलेल्या दरोड्याचे धागेदोरे थेट लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचल्याने सांगली जिल्हा हादरला आहे. या हायप्रोफाइल चोरीप्रकरणी अंकली ग्रामपंचायतीचे प्रशासक सरपंच राहुल पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुंडाविरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयिताकडून तब्बल ५ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात राजकीय दबावासह एका 'वडापाव' नावाच्या व्यक्तीची संशयित लुडबूड आणि मध्यस्थीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

​कारवाईचा घटनाक्रम:
चोरीचा तपास: बँक मॅनेजरच्या घरातील घरफोडीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि खबरींच्या माहितीनुसार एलसीबी च्या पथकाने थेट राहुल पाटील यांना ताब्यात घेतले.

​मुद्देमाल जप्त: खाक्या दाखवताच संशयिताने चोरीतील सहभाग कबूल केला. त्याच्याकडून ५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

​जामिनावर सुटका: अटकेनंतर संशयिताची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयीन प्रक्रियेत त्यांना तात्काळ जामीन मंजूर होऊन सुटका झाली.
​'वडापाव'ची लुडबूड अन् राजकीय दबाव?

सरपंच राहुल पाटील हे फेब्रुवारी महिन्यापासून अंकली ग्रामपंचायतीत प्रशासक सरपंच म्हणून कार्यरत आहेत. चोरीत थेट सरपंचाचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, कारवाईदरम्यान सरपंचाला वाचवण्यासाठी आणि गुन्हा झाकण्यासाठी राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातच एका स्थानिक 'वडापाव'ची झालेली लुडबूड आणि प्रकरण मिटवण्याचा झालेला प्रयत्न आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. खाकी वर्दीने मात्र कोणाचाही दबाव न जुमानता थेट कारवाईचा बडगा उगारल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

तपास पथक:
सदरची कारवाई गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख तथा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने अत्यंत धडाकेबाज पद्धतीने पार पाडली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.