🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता पूर्ण देशात चालणार एकच 'सरकारी घड्याळ'... प्रत्येक कामासाठी IST कंपलसरी, सिस्टीम कशी बदलणार?

आता पूर्ण देशात चालणार एकच 'सरकारी घड्याळ'... प्रत्येक कामासाठी IST कंपलसरी, सिस्टीम कशी बदलणार?


नवी दिल्ली : सरकारकडून वन नेशन वन इलेक्शनसाठी खास प्रयत्न केले जात असतानाच आता वन नेशन वन टाईम सिस्टीम सुरू होणार आहे, यामुळे सर्व वेळा या इंडियन स्टँडर्ड टाईम (IST) वर चालतील. यासाठी सरकारने लिगल मेट्रोलॉजी (इंडियन स्टँडर्ड टाईम) रूल्स 2026 ला नोटिफाय केलं आहे, त्यामुळे आता देशात लिगल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, कमर्शियल  इतर सरकारी कामांसाठी IST हे एकमेव प्रमाण मानलं जाईल.

हा नियम कनज्युमर अफेयर्स मिनिस्ट्रीने 27 ऑगस्टला नोटिफाय केला होता, पण हा नियम 180 दिवसानंतर लागू होणार आहे. या नियमामुळे सरकारी विभाग, व्यवसाय आणि संस्थांना आपल्या सोयीने सिस्टीममध्ये यायचा वेळ मिळणार आहे.
काय आहेत सरकारचे नवे नियम?


27 ऑगस्टला कनज्युमर अफेयर्स मिनिस्ट्रीने हा नियम नोटिफाय केला, ज्यात आता प्रत्येक ठिकाणी IST च चालेल असं स्पष्ट करण्यात आलं. हा नियम सरकारी गॅझेटमध्ये प्रकाशित झाल्यानंतर 180 दिवसांनी लागू होईल, म्हणजेच हा नियम मार्च 2027 पासून अंमलात आणला जाईल.
नियमात बदल का झाले?

डिजिटल आणि टेक्नोलॉजीसोबत आधारित सिस्टीमचा उपयोग वाढत आहे, त्यामुळे एक समान वेळ ठेवण्याची गरजही वाढली आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं. आतापर्यंत अशी समान वेळ नव्हती, पण नवे नियम लागू झाल्यानंतर मार्च 2027 पासून प्रत्येक ठिकाणी फक्त IST चाच वापर होईल.


बँकिंग आणि डिजिटल पेमेंट, टेलिकॉम, रेल्वे, पॉवर सिस्टीम, कम्प्यूटर नेटवर्क आणि सरकारी रेकॉर्ड अचूक वेळ आणि टाईम स्टँपवर अवलंबून असतात. वेळेमध्ये असलेल्या फरकांमुळे अनेक गोष्टी प्रभावित होऊ शकतात. या नियमामुळे देशभरातल्या महत्त्वाच्या सिस्टिम अचूक होतील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
काय फायदा होणार?

सध्या वेगवेगळ्या वेळा वापरल्या जात असल्यामुळे ताळमेळ आणि रेकॉर्डिंगवर याचा परिणाम होत आहे, त्यामुळे IST चा वापर करून या गोष्टींचा ताळमेळ योग्य व्हायलाा मदत होईल, अशी प्रतिक्रिया सरकारने दिली आहे.

- बँकिंग आणि डिजिटल पेमेंटसाठी अचूक टाईम स्टँपिंग

- रेल्वे, एयरपोर्ट आणि इतर ट्रान्सपोर्ट सिस्टिममध्ये योग्य ताळमेळ

- टेलिकॉम आणि इंटरनेट नेटवर्कचं विश्वासार्ह कामकाज

- पॉवर सिस्टिमचं अचून टाईम कीपिंग

- सरकारी आणि कायदेशीर रेकॉर्डचा मेनटेनन्स अधिक चांगला होणार

- इमरजन्सी आणि इतर वेळेशी निगडित सेवांमध्ये आणखी चांगला ताळमेळ होणार

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.