🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात PM मोदी, 'आरएएस'बाबत खळबळ उडवून देणारे खुलासे? पुस्तक छापण्यापूर्वीच प्रकाशकाची माघार; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात PM मोदी, 'आरएएस'बाबत खळबळ उडवून देणारे खुलासे? पुस्तक छापण्यापूर्वीच प्रकाशकाची माघार; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

ज्येष्ठ नेत्या आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं आत्मचरित्र 'बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' प्रकाशित होण्यापूर्वीच बड्या प्रकाशकानं यातून माघार घेतली आहे.

याचं कारणही आता समोर आलं असून या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत खळबळ उडवून देणारे खुलासे करण्यात आले असून त्यामुळंच सरकारच्या दबावापोटी प्रकाशकानं यातून काढता पाय घेतला आहे, असा आरोप काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं केला आहे.

पुस्तकात काय आहे खबळजनक?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राजस्तानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या पुस्तकावरुन खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'पेंग्विन वर्ल्डवाइड' हे श्रीमती सोनिया गांधी यांचे आगामी पुस्तक त्याच्या मूळ स्वरूपात जगभरात प्रकाशित करण्यास सज्ज आहे. परंतू 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया'ला भारतात ते प्रकाशित करताना त्यात बदल हवे आहेत. पण यामागे असं कोणते कारण किंवा कोणता दबाव आहे की ज्यामुळे जे पुस्तक जगभरात प्रकाशित होत आहे, ते भारतात प्रकाशित होऊ शकत नाही?

 माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकानंतर आता सोनिया गांधींच्या पुस्तकावरुन वाद? 'पेंग्विन' प्रकाशनाची माघार; लेखिका म्हणून केले मोठे आरोप
श्रीमती सोनिया गांधी यांचे जीवन हे त्याग आणि समर्पणाचे उदाहरण आहे. त्यांनी ज्या सचोटीने आणि प्रतिष्ठेने देशाची सेवा केली आहे, ती अनुकरणीय आहे. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या, देशाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी विरोधी पक्षनेत्या असलेल्या श्रीमती सोनिया गांधी यांचे पुस्तक दबावाखाली दाबून टाकणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या करण्यासारखेच आहे.

मूळ मुद्दा असा आहे की, मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि मोदींच्या कार्यकाळात चीनने भारतीय भूभागावर केलेला ताबा यांशी संबंधित भाग काढून टाकण्यासाठी 'पेंग्विन इंडिया'वर दबाव टाकण्यात आला होता. ही लोकशाहीची हत्या आहे. भारतातील जनतेपासून हे सत्य का लपवले जात आहे? मोदी सरकार प्रकाशकांवर दबाव आणून वस्तुस्थितीमध्येही फेरफार करणार आहे का? असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही पेंग्विन इंडियाला दबावाखाली पुस्तक मागे घ्यावं लागलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं 'फोर स्टार्स ऑफ डिस्टिनी' हे आत्मचरित्र प्रकाशित होणार होतं. पण त्यातही गलवान इथं झालेल्या भारत-चीन संघर्षावेळी चीनला प्रत्युत्तर देण्यापासून लष्कराला रोखलं गेल्याचा उल्लेख असल्याचं सांगितलं गेलं होतं. या उल्लेखामुळं या पुस्तकाला प्रकाशित होण्यापासून रोखलं होतं. हे पुस्तकही पेंग्विन इंडियाचं प्रकाशित करणार होतं. उलट विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाची प्रत थेट संसदेत दाखवून खळबळ उडवून दिली होती.

त्याचबरोबर जून महिन्यात 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया'नं मुजफ्फरनगर दंगलीवर आधारित कांदंबरीकार जो सैको यांचं पुस्तक 'द वन्स अँड फ्युचर राईट' याची छपाई थांबवली होती. त्यावेळी सीईओ श्रीनागेश यांनी म्हटलं होतं की, प्रकाशकानं कायदेशीर चौकशी दरम्यान लेखकाजवळ काही मुद्दे उपस्थित केले होते. ज्यामध्ये भारताच्या चुकीच्या सीमा दाखवणारा एक नकाशा होता.

अशा प्रकारे तीन महत्वाची पुस्तकं मागे घ्यावी लागल्यानं किंवा रोखावी लागल्यानं प्रकाशक म्हणून पेंग्विन रँडम हाऊस इंडियावर मोठी नामुष्की ओढवल्याचं बोललं जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.