🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बोगस प्रमाणपत्रांवर पोलीस भरती? पुण्यात 75 कोटींचा महाघोटाळा उघडकीस; 'औरंगाबाद' शब्द ठरला टर्निंग पॉईंट!

बोगस प्रमाणपत्रांवर पोलीस भरती? पुण्यात 75 कोटींचा महाघोटाळा उघडकीस; 'औरंगाबाद' शब्द ठरला टर्निंग पॉईंट!


पुणे शहर पोलीस दलात तब्बल 19 जणांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'कुराश' या पारंपरिक कुस्ती आणि 'ड्रॅगनबोट' खेळाचं बनावट क्रीडा प्रमाणपत्र तयार करून पोलिसांचीच फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला होता जी स्पर्धा कधी घेतलीच गेली नाही, त्याचं प्रमाणपत्र वाटण्यात आले होते. या प्रकरणावर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

संभाजीनगर नावं वापरल्यानं बिंग फुटलं
बोगस प्रमाणपत्राचा वापर करून शासकीय नोकरीत 5 टक्के क्रीडा आरक्षण मिळवणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचं एका नावामुळे बिंग फुटलं. झालं असं की, 2018-19 मध्ये वाटलेल्या या प्रमाणपत्रांवर औरंगाबाद आणि उस्मानाबाद असायला हवं होतं पण प्रमाणपत्रावर 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' ही नावे वापरल्याने रॅकेटचे बिंग फुटलं. दोन्ही शहरांचं नामांतरण तर 2023 मध्ये झालं होतं. मग 2018 मध्ये प्रमाणपत्रावर नावं कशी आली? असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना पडला अन् इथून प्रकरणाचा खुलासा झाला.
पोलिस दलात 19 जण बोगस भरती

या प्रकरणात आता पोलिसांनी तातडीची कारवाई सुरू केली असून बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे पोलिस दलात 19 जण भरती झाले. या सर्वांची नियुक्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. 2016 पासून राज्यात 1200 ते 1500 जणांना प्रत्येकी 3 ते 5 लाख रुपये घेऊन ही बोगस प्रमाणपत्रे विकल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे हा घोटाळा साधासुधा नसून तब्बल 75 कोटींचा असू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणातील मालमत्तेची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी नोंदणी व मुद्रांक विभाग व आयकर विभागाला पत्र पाठवलं आहे. त्यामुळे मोठा घोटाळा समोर येऊ शकतो. क्रीडा निरीक्षक उपस्थित नसताना, कोणतेही रेकॉर्ड, शुल्काची पावती पुस्तक किंवा खेळाडूंचे फोटो नसतानाही बोगस प्रमाणपत्रे तयार करून ती उमेदवारांना विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने तत्परतेने कारवाई करत महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे या दोघांना अटक केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.