मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील तीन वरिष्ठ विभागीय उपायुक्तांना सहआयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली असून, त्यांच्या नव्या पदस्थापनांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्य शासनाचे उपसचिव रवींद्र ओटे यांच्या स्वाक्षरीने हे अधिकृत आदेश काढण्यात आले आहेत.
प्रशासकीय कामकाजात अधिक गती आणि सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने या पदोन्नती व बदल्या करण्यात आल्या आहेत.
पदोन्नती मिळालेले अधिकारी आणि त्यांची नवीन पदस्थापना:संगीत दरेकर : सह आयुक्त (प्रशासन), आयुक्त कार्यालय, मुंबई.विजय चिंचाळकर : सह आयुक्त (संगणकीकरण), आयुक्त कार्यालय, मुंबई.उषा राजेंद्र वर्मा : सह आयुक्त (मही व मद्यार्क), आयुक्त कार्यालय, मुंबई.
पदोन्नती मिळालेल्या तिन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने आपापल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कार्यालयातील संगणकीकरण, प्रशासन आणि मद्य व मद्यार्क विभागाच्या कामकाजाला या नव्या नियुक्त्यांमुळे नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.