ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दराचा भडका उडाला आहे. आगामी सणासुदीमुळे खाद्यतेलासाठी वाढलेली मागणी व पुरवठ्यातील तुटवड्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या दरात २० ते ३० रूपयांनी वाढ झाली आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेत करडी आणि शेंगदाणे तेलाच्या दरात प्रत्येकी २० रूपयांची घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अन्य खाद्यतेलाच्या दरातील वाढ मात्र ग्राहकांना झटका देणारी आहे. गतवर्षी याच दिवसात खाद्यतेलाचे दर ११५ रूपयांच्या घरात होते.
खाद्यतेलाच्या दरामध्ये सातत्याने वाढ सुरू असून दरवाढीवर शासनाने निर्बंध लागू करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे. खाद्यतेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने आर्थिक घडी विस्कटली आहे.
देशांतर्गत पुरवठ्यात घट गत हंगामातील तेलबियांचे साठे संपत आल्यामुळे तेल कारखान्यातील गाळप संथ झाले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात तेलाचा पुरवठा कमी आहे. सणासुदीच्या दिवसात तेलासाठी वाढती मागणी असताना पुरवठा कमी असल्यामुळे त्याचा दरावर परिणाम झाला असल्याचे विक्रेते सांगत आहेत. घाऊक बाजारातच दर वाढल्यामुळे किरकोळ विक्रीवर त्याचा परिणाम होत आहे.
पुरवठा विस्कळीत भारतामध्ये गरजेच्या ६० टक्के खाद्यतेल आयात करण्यात येते. इराण-इस्त्रायल संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित झाली असून विमा व वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. याचा संयुक्त परिणाम खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे.
खाद्यतेलाचे दर
तेलाचे प्रकार आधीचे दर आताचे दर
सूर्यफूल ₹१७५ ₹१९०
सोयाबीन ₹१५२ ₹१६२
पामतेल ₹१५२ ₹१६५
शेंगदाणा ₹२०५ ₹२२०
₹२८० ₹२६५
सरकी ₹१६० ₹१८५
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.