🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकशाहीचा उखाणा: "महागाईची फोडणी अन् साखरेचा भडका; मोदीकाका, चहाचा कप सोडून दारूचा पेग धरू का?"

लोकशाहीचा उखाणा: "महागाईची फोडणी अन् साखरेचा भडका; मोदीकाका, चहाचा कप सोडून दारूचा पेग धरू का?"


मोदी काळात वाढलेल्या महागाईच्या विरोधातील सर्वसामान्यांचा संताप आता लोकल ट्रेन आणि सोशल मीडियात चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा संताप गाण्यांतूनही व्यक्त होऊ लागला आहे. साखरेच्या दरामुळे त्रस्त होऊन एका तरुणाने भोजपुरी गाणे बनवले आहे.


'साखरेचा आणि एक पौवा दारूचा भाव सारखाच झाला आहे. मग आता चहा पिऊ की दारू हे तुम्हीच सांगा,' असा उपरोधिक प्रश्न या गाण्यातून थेट पंतप्रधान मोदींना करण्यात आला आहे.

अशोक प्रेमी यादव नावाच्या तरुणाने हे गाणे गायले आणि लिहिले आहे. त्याने साखरेच्या भावाची तुलना दारूच्या भावाशी केली आहे. साखरेचे दर सध्या किलोमागे 75 रुपयांवर गेले आहेत. त्याच भावात आमच्याकडे क्वार्टर मिळते. त्यामुळे चहा प्यायची की दारू असा प्रश्न आमच्यापुढे आहे. मोदीकाका, तुम्हीच याचे उत्तर द्या, अशी टोलेबाजी यादव याने गाण्यातून केली आहे. जे लोक जास्त चहा पितात त्यांचे तोंड कावळ्यासारखे झाले आहे, असेही गाण्यात नमूद करण्यात आले आहे.

मोदींनी माहौल बिघडवून टाकलाय!

'पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवून मोदींनी संपूर्ण माहौल बिघडवून टाकला आहे. महागाईमुळे बायकोने आमचा जीव खाल्ला असून जास्त कमाईसाठी आमच्यावर दबाव येतो आहे. त्यामुळे आम्ही टेन्शनमध्ये आलोय, अशी व्यथाही अशोकने गाण्यातून मांडण्यात आली आहे.

दहा दिवसांत अडीच लाखांहून अधिक लाइक्स

सद्यस्थितीवर खोचक आणि मार्मिक भाष्य करणारे हे गाणे व्हायरल झाले आहे. यूटय़ूबवर अवघ्या दहा दिवसांत या गाण्याला अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. लोक यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. भोजपुरी इंडस्ट्री न्यूज मीडियापेक्षाही वेगवान झाली आहे. ताज्या घडामोडींवर लगेच गाणी तयार होत आहेत, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

कडवे १:

दूध झाले महाग, अन् साखर झाली दुर्मिळ,
पत्तीचे भाव बघून फिरतोय डोक्याचा पीळ!
गोड चहा पिणे आता स्वप्नच झाले,
आमच्या हसऱ्या तोंडाचे पाणीच पळाले.
कसा गडू उतरवू, सांगू कुणाला व्यथा?
काका तुमच्या राज्यात वाढली मोठी चिंता!
सांगा आता कपाने प्यायचे की बाटलीने भरू?
मोदीकाका सांगा, चहा पिऊ की दारू?


​कडवे २:

दारूच्या दुकानावर मिळतोय थोडा दिलासा,
पण चहाच्या टपरीवर उरला नाही भरवसा!
चहाने होतो पित्त, अन् भावाने होतो त्रास,
दारू पिऊन तरी जरा विसरतो हा श्वास!
गरिबाच्या ताटातली गोडीच तुम्ही काढली,
महागाईची कुऱ्हाड आमच्या मानगुटीवर मारली.
या जगण्याचा आता कसा ताल आम्ही धरू?
मोदीकाका सांगा, चहा पिऊ की दारू?

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.