🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ज्येष्ठ अभियंता नारायणराव नलावडे यांचे सांगलीत निधन​

ज्येष्ठ अभियंता नारायणराव नलावडे यांचे सांगलीत निधन
सांगली :-वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त अभियंता श्री. नारायण शंकर नलावडे (वय ९४, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, सांगली) यांचे शनिवारी, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अभ्यासू व ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

​नारायणराव नलावडे यांनी वसंतदादा साखर कारखान्यात दीर्घकाळ अभियंता म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे आणि मनमिळावू स्वभावामुळे कारखान्यातील कर्मचारी व मित्रपरिवारात त्यांचा मोठा स्नेहबंध होता.

​त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
​उद्या रक्षाविसर्जन विधी

स्व. नारायणराव नलावडे यांचा रक्षाविसर्जन विधी मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता अमरधाम स्मशानभूमी, सांगली येथे पार पडणार असल्याचे नलावडे परिवाराकडून सांगण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.