"बाथरूममध्ये जाऊन ढसाढसा रडते..."; अपयशानंतरच्या वेदनेवर स्मृती मानधना व्यक्त, केला महत्त्वाचा खुलासा
टीम इंडियाची धडक बॅटर आणि सांगली सुपरस्टार क्रिकेटर स्मृती मानधना सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आशिया कपमध्ये स्मृती टीम इंडियाने अनेक मॅच जिंकून देतीये.
अशातच आता स्मृती मानधनाने राज शमानीसोबत एक पॉडकास्ट केला. तेव्हा तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या दोन वर्षात स्मृतीच्या खासगी आयुष्यात अनेक उलथापालथ झाल्या आहेत. अशातच स्मृतीने आपल्या भावना पॉडकास्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.
काय आहे स्मृतीचा 30 मिनिट रूल?
मी जास्त इमोशनल नाहीये. माझ्या आजूबाजूचे लोक जास्त इमोशनल असतात तेव्हा मी प्रॅक्टिकली विचार करणारी आहे. कधीतरी माझ्यातील इमोशनल व्यक्ती बाहेर येते पण मी 30 मिनिटाच्या रूलने पुन्हा आपल्या जागेवर परत येते. कधी मला रडायला आलं तर मी बाथरूममध्ये शॉवर लावून रडते. तर कधी कधी एक दोन लोक आहे, त्यांसमोर माझ्या भावना समोर येतात, असं स्मृती मानधना म्हणाली.
मी माझ्या आयुष्यावर कधी रडत नाही - स्मृती मानधना
शेवटचं कधी रडली होती? असा सवाल स्मृतीला राज शमानीने विचारला तेव्हा स्मृतीने चांगला प्रश्न म्हणत हलक्यात उत्तर दिलं. मला जास्त काही आठवत नाही. मी सिनेमा पाहिल्यावर रडते. मी माझ्या आयुष्यावर कधी रडत नाही. आत्ता मी मुसाफिर कॅफे पाहिली, तेव्हा मला रडायला आलं. मला असंच काहीतरी करावं वाटतं, असंही स्मृती मानधना म्हणाली.
मागील गोष्टींचा पश्चाताप होत नाही - स्मृती मानधना
ज्या लोकांना भुतकाळातील गोष्टीतून धडा घेऊन शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मागील गोष्टींचा पश्चाताप होत नाही. जर तुम्ही त्याच गोष्टी धरून रडत बसलात तर तुम्हाला यातून काय मिळणार आहे? तुम्ही स्वत:ला तयार करत नाही. तुम्ही सुधरत नाही. मी कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त वेळ पश्चाताप करत नाही, असंही स्मृती मानधना म्हणाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.